महाराष्ट्र

Mahayuti: महायुतीत निधीवरुन वादावादी? कॅबिनेटमध्ये अजितदादा-महाजनांमध्ये खडाजंगी?

Mahayuti : महायुतीत निधीवाटपावरुन खंडाजंगी होत असल्याच बाब समोर आलीय. मंत्र्यांमध्येच वादावादी झाल्याचं समोर आलंय.

Tanmay Tillu

महायुतीत सध्या पेल्यातली वादळं उठतायत. कधी अजितदादांवर संघाकडून जाहीर टीका केली जातेय तर कधी निधीसाठी भर कॅबिनेट बैठकीत महायुतीचे मंत्रीच आपापसात भिडल्याचं समोर आलंय. त्यामुळे महायुतीतले आमदार अस्वस्थ झाले आहेत. भाजपचा अजितदादांसोबतचा निधीचा वाद आणि त्यांच्यावर उफाळून आलेलं प्रेम यावरचा हा विशेष रिपोर्ट.

महायुतीत विकास निधीवरून कॅबिनेटच्या बैठकीत थेट मंत्र्यांमध्येच वादावादी झाल्याचं समोर आलंय. मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या अशी मागणी गिरीश महाजनांनी केली. त्यावर निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का असा सवाल अजित पवारांनी विचारल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मात्र या वादावर महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटेंनी शिक्कामोर्तब केलंय. मंत्र्यांमध्येच निधीवरून स्पर्धा सुरू असेल तर आमदारांचं काय असा सवाल त्यांनी केलाय.

एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चांवरून चलबिचल सुरू आहे. त्यात आता निधीवरूनही खडाजंगी सुरू असल्यामुळे महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेची तयारी सुरू झाली असून महायुतीने सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. मात्र निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांआधीच महायुतीमध्ये निधीवाटपावरुन वाद असल्याचं दिसतंय.

तर दुसरीकडे भाजपचे अनेक नेते आणि संघाशी संबंधित साप्ताहिकांमध्ये अजित पवारांवर टीका करतायत, या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून अजित पवारांवर टीका करणे टाळा अशी विनवणी संघाला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सामला दिलीये. एकीकडे निधीवाटपावरुन भाजपच्या मंत्र्यांची अजितदादांसोबत वादावादी सुरू असताना दुसरीकडे भाजप दादांसाठी संघाला चुचकारण्याचाही प्रयत्न करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT