Shinde Group Minister Disappoint: mid day
महाराष्ट्र

Mahayuti Government: महायुतीत पुन्हा धुसफूस? शिंदे गटाच्या मंत्र्यांची कोंडी? उदय सामंतांची उघड नाराजी

Shinde Group Minister Disappoint: महायुती सरकारमध्ये आलबेल नाहीये. दोन महिनेही उलटले नाहीत तोच मंत्र्यांची नाराजी दिसून आलीय. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याबाबत आदेश न निघणे, मंत्र्यांच्या फाईल्स अडवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Bharat Mohalkar

महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. कारण शिंदेंच्या मंत्र्य़ांची अनेक आघाड्यांवर कोंडी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एकनाथ शिंदेंनाही भाजपनं धक्का दिलाय. शिंदेंना कोणता धक्का दिलाय? आणि नेमक्या कोणत्या मंत्र्यांची कोंडी केलीय ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

महायुती सरकारला 2 महिनेही उलटले नाहीत तोच मंत्र्यांची नाराजी उफाळून आलीय.. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्योगमंत्री उदय सामंतांनी सरकारच्या कारभाराविषयी पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. एमआयडीसी संदर्भातील निर्णय अधिकारी प्रशासकीय पातळीवर घेत असल्याचं सामंतांनी सांगितलंय. त्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात.

सामंतांच्या पत्रात नेमकं काय?

मंत्र्यांना डावलून एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे धोरणात्मक निर्णय

एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिकाऱ्यांकडून परस्पर कपात

उद्योग विभागाच्या अनेक निर्णयांचं अधिकाऱ्यांकडून केंद्रिकरण

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याबाबत आदेश न निघणे, मंत्र्यांच्या फाईल्स अडवून धरल्याची चर्चा रंगलीय.. एवढंच नाही तर मुख्यमंत्री कार्यालय शिंदे गटाला वारंवार धक्के देत असल्याचंही समोर आलंय.. ते नेमकं कसं? पाहूयात.

शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी?

एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द करुन पहिला धक्का

एसटी महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करुन सरनाईकांना झटका

आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना डावलून दादांना झुकतं माप

मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या

एमआयडीसी विभागात मंत्र्यांना बायपास करुन अधिकाऱ्यांचे निर्णय

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली महत्वाकांक्षा कायम ठेवत मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.. त्यानंतर गृह खातं आणि पालकमंत्रिपदावरुन शिंदेंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.. त्यामुळेच सीएमओकडून शिंदेंची कोंडी केली जातेय का? याची चर्चा रंगलीय.. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेऊन ही कोंडी फोडणार की महायुतीतील दरी आणखी वाढत जाणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT