Nandurbar News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News : धक्कादायक! विजेच्या शॉकने कर्मचाऱ्याचा मृत्यू; बराच वेळ उलटूनही मृतदेह खांबावर लोंबकळत

गावात एकच संतापाची लाट पसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. विजेचा शॉक लगल्याने एका महावितरण कर्मचाऱ्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत माहावितरण कंपनीचा हलगरजीपणा समोर आला आहे. बराच वेळ झाला तरी मृत व्यक्तीचे शव विजेच्या खांबावरच पडून होते. या घटनेने गावात एकच संतापाची लाट पसरली आहे.(Latest Nandurbar News)

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील वडखुट येथे ही घटना घडली आहे. गावात वीज पुरवठा खंडीत झाला होता.त्यामुळे पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी थेट विजेच्या डिपीवर चढला होता. यावेळी वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर अचानक कर्मचाऱ्याला याचा जोरदार झटका बसला.

वीजेचा तिव्र झटका लागल्याने कर्मचारी तिथेच तारांना चिकटून राहीला. गावकऱ्यांना हे समजताच त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला आणि तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यास सांगितले. मात्र महावितरण कंपनीने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केलं. वीजेचा शॉक लागलेला कर्मचारी विजेच्या तारांवर पडून मृत्यू पावला होता.

त्याचा मृतदेह खाली घेण्यासाठी गावकरी आणि कुटुंबिय तेथे जमा झाले होते. मात्र महावितरण कर्मचारी आल्याशिवाय त्यांना मृतदेह खाली घेणे शक्य नव्हते. त्यामुळे गावकरी आणि कुटुंबिय पाणावलेल्या डोळ्यांनी तारांवर अडकून पडलेल्या कर्मचाऱ्याकडे पाहात होते. या हृदयद्रावक घटनेमुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भात कुटुंबियांनी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT