Mla Shivendraraje Bhosale
Mla Shivendraraje Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

संभाजीराजेंचा गेम कोणी केला,कोणत्या पक्षाने केला: शिवेंद्रराजे भोसले

ओंकार कदम

सातारा: राज्यसभेच्या उमेदवारीवरुन गेल्या काही दिवसापासून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) चर्चेत आहेत. संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी नाकारली. आज संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं संभाजीराजे भोसले म्हणाले. यावर आता राज्यभरातून प्रतिक्रीया येत आहेत. आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही प्रतिक्रीया दिली. संभाजीराजे यांचा गेम झाला असल्याची प्रतिक्रीया शिवेंद्रराजे यांनी दिली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटत आहे त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कोणी केला, हे संभाजीराजेंना चांगलेच माहित आहे.

संभाजीराजेंच्या पाठिमागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. त्यांच्या गडकिल्ले संवर्धनाचे काम, मराठा आरक्षण लढाईत त्यांचे योगदान आहे. छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

हे देखील पाहा

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election 2022) कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं संभाजीराजे भोसले म्हणाले.

संभाजी राजे यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, मला इतके प्रेम दिले मी विसरू शकत नाही. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर मी १२ मे ला पुण्यात भूमिका स्पष्ट केली होती. अपक्ष उमेदवारी मी लढणार असे म्हणालो होतो. मला सगळी गणिते माहीत होती. पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहित होते. मला अनुभवायचे होते. खासदार म्हणून मला कोणी पाठवले हे न पाहता समाजासाठी मी काम करत होतो. राज्यसभेत मला सगळ्यांनी पाठवावे असे वाटत होते. माझ्या रक्तात, तत्वात नाही ते मी आज बोलणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gurucharan Singh : गुरूचरण सिंह बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी कुठे होता? वडिलांनी सांगितली सर्व घटना

Facial केल्यानंतरही चेहरा काळपट दिसतोय ?Glow टिकवण्यासाठी 'या' काळजी घ्या

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करा, कार्ला मळवली ग्रामस्थ आक्रमक

Sharad Pawar Health: शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; आमदार रोहित पवारांनी दिली महत्वाची माहिती

MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

SCROLL FOR NEXT