दगडूशेठचे दर्शन न घेताच शरद पवार परतले; दर्शन न घेण्याचे सांगितले हे कारण

शरद पवार यांनी दगडूशेठचे दर्शन बाहेरुनच घेतल्यामुळे विरोधकांनी टीका केल्या आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv

पुणे : राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पवार यांनी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे बाहेरुनच दर्शन घेतले. बाहेरुनच दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पवार यांनी बाहेरुन मुखदर्शन का घेतलं याचे कारण समोर आले आहे. पवार यांनी मांसाहारी खाल्ले असल्यामुळे बाहेरुन दर्शन घेतले असल्याचे सांगितले आहे.

Sharad Pawar
'छत्रपतींशी खोटं बोलू शकतात ते अमित शहांशीही बोलू शकतात'

दगडुशेठ हलवाई गणपतीचे बाहेरुन दर्शन घेतल्यामुळे शरद पवार यांच्यावर आता टीका होत आहेत. यावर पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मंदिराला अजुन जागेची आवश्यकता आहे. बाजूला असणारी जागा गृहविभागाची आहे. या जागेची पाहणी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली. दगडुशेठ गणपती जवळ गेल्यानंतर दर्शनासाठी विचारले पण शरद पवार यांनी आपण मांसाहर खाल्ले असल्यामुळे मी चुकीचा पायंडा पाडणार नाही. माझ्या बुद्धीला ते पटणार नाही. त्यामुळे मी बाहेरुनच दर्शन घेतो, असं पवार यांनी यावेळी म्हटले, असंही प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले.

Sharad Pawar
Monsoon Update 2022: पुढच्या दोन दिवसात मान्सूनचे होणार आगमन

या दरम्यान शरद पवारांनी आज पुण्यात भिडे वाड्याची (Bhide Wada) पाहणी केली. भिडे वाडा स्मारकासाठी यंदाच्या बजेटमध्ये अजित पवार यांनी १५ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. म्हणून शरद पवार यांनी भिडे वाड्याची यावेळी पाहणी केली असे जगताप यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ गणपती महाराष्ट्र आणि पुणेकरांच्या आस्थेचं हे प्रतिक असून गणपतीवर अनेकांची श्रद्धा आहे. मला या गोष्टीता सार्थ अभिमान आहे की, मला आणि पवारांना काही दोघं-तिघांनी दर्शन घेण्याबाबत विचारले होते. असंही प्रशांत जगताप म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com