Monsoon Update 2022: पुढच्या दोन दिवसात मान्सूनचे होणार आगमन

मान्सून'साठी केरळच्या किनारपट्टीवर पोषक वातावरण.
Monsoon Update 2022
Monsoon Update 2022Saam Tv

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) आनंदाची बातमी समोर आली आहे. या वर्षी जूनच्या अगोदरच मान्सूनचे आगमन होणार आहे. येत्या ४८ तासात मान्सून (Monsoon) केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरवर्षी मान्सूनचे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आगमन होते. पण या वर्षी मान्सून वेळे अगोदरच दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त दिवस पावसाची वाट पहावी लागणार नाही. (Monsoon Update 2022)

गेल्या दोन दिवसापासून मान्सूनला श्रीलंकेच्या वेशीवर ब्रेक लागला होता. पण पुन्हा मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास सुरु झाला आहे. आता केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मान्सून (Monsoon) आता पुढील ४८ तासात केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Monsoon Update 2022
'छत्रपतींशी खोटं बोलू शकतात ते अमित शहांशीही बोलू शकतात'

महाराष्ट्रात कधी सुरु होणार मान्सून?

मान्सून (Monsoon) पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्रात दाखल होईल. पुढे आज २७ मे रोजी केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील पाच दिवसात म्हणजेच १ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पण हा पाऊस कोकण, गोव्यात आणि राज्यातील काही भागात पडेल. हा पाऊस मध्यम कमी प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे. तसेच पुढे काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनची आता काय परिस्थीती आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Monsoon Update Latest News)

Monsoon Update 2022
संभाजीराजे छत्रपतींनी मनाचा मोठेपणा दाखवला तो स्वागतार्ह : सुप्रिया सुळे

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या ताजा अंदाजानुसार आज मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. कालपर्यंत मान्सून हा श्रीलंकेत होता मात्र, श्रीलंकेत मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सूनची गती आता वाढली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात येणाऱ्या पाच दिवसात मान्सूनचे (Monsoon) आगमन होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची पेरणीसाठीच्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मान्सून वेळेअगोदरच दाखल होणार आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com