Sharad Pawar On Suspension Of MP Saam Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar: पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा

साम टिव्ही ब्युरो

Pune News:

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २७ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत पुण्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात दाखल होणार असून जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी शरद पवार आपल्या भाषणातून काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर तीन दिवस महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी पुण्यात एल्गार पुकारलाय. २९ तारखेला बारामतीमध्ये महाविकास आघाडीतर्फे मशाल मोर्चा निघणार आहे. तर ३० तारखेला शरद पवार यांची पुण्यात होणार सभा होणारे. यावेळी शरद पवार यांच्यासह संजय राऊत देखील सभेला उपस्थितीत राहणार आहेत.

महाविकास आघाडीतर्फे येत्या २७ डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामोर्चा संदर्भात आढावा घेण्यासाठी आज खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

राज्यात शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहेत. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसाना झालेय. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी सातत्याने मागणी होत आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच शिल्लक मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची तक्रार शेतरकी करत आहेत.

दूधाला आणि शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जातेय. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे देखील शेतकऱ्यांच्यावतीने नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नगर- दौंड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT