महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, तर महायुतीतही संघर्ष

Nashik Loksabha Election Politics : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर माकपने दावा केला आहे. तर महायुतीत भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होताना दिसत आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूने संघर्ष कायम आहे. नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. तर महायुतीतही बिनसण्याची शक्यता आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर माकपने दावा केला आहे. तर महायुतीत भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होताना दिसत आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरीची जागा माकपसाठी सोडावी असा आग्रह माकपचे नेते जे. पी. गावीत यांनी केला आहे. शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याचा दावा माकपने केला आहे.

माकपने दिंडोरी लोकसभेची जागा लढवण्याच्या तयारी देखील केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने जागा न सोडल्यास माकप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. माजी आमदार जे पी गावित दिंडोरी मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक आहे. दिंडोरीची जागा लढवण्यावर माकप ठाम असल्याने मतांचा विभाजन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे स्थानिक नेते नाखुश

नाशिकची जागा शिंदे गटाकडून भाजपकडे घेण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुर आहेत. नाशिकच्या जागेवर महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने महायुतीत दावे-प्रतिदावे केले जात आहे. नाशिकमध्ये भाजपचे ३ आमदार, सर्वाधिक नगरसेवक आणि पक्षाची ताकद जास्त असल्यानं स्थानिक भाजप नेते शिंदे गटाला जागा सोडण्यावरुन नाखूश आहेत.

हेमंत गोडसेंविषयी मतदारसंघात नाराजी

शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार हेमंत गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी आहे, असा दावाही स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे. शिंदे गटाला जागा दिल्यास नाशिकची जागा धोक्यात येईल. नाशिकची जागा जिंकायची असल्यास भाजपचाच उमेदवार द्यावा. अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT