Mahashivratri 2024 Marathi News  Saam TV
महाराष्ट्र

Mahashivratri 2024: हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त सजली राज्यातील शिवमंदिरे; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Mahashivratri 2024 News: महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील शिवमंदिरे सजली असून, भगवान शंकराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता. ७) मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी मंदिरांमध्ये अलोट गर्दी केली आहे.

Satish Daud

Mahashivratri 2024 Marathi News

महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील शिवमंदिरे सजली असून, भगवान शंकराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता. ७) मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी मंदिरांमध्ये अलोट गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर, पुण्यातील भीमाशंकर, आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांनी फुलून गेले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिरात शुक्रवारी पहाटेपासून पूजा विधीला सुरुवात झाली आहे. आज शंकराच्या पुजेला विशेष महत्व असल्याने शंकराच्या पिंडीवर बेल पत्र, दुधाभिषेक करण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत. (Latest Marathi News)

दरवर्षी औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. यंदाच्या वर्षी मात्र पहिल्यांदाच, शिवभक्त असलेल्या एका शेतकऱ्याने मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसराला केशर आंब्यांच्या फळांची सजावट केली आहे.

दुसरीकडे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या आहेत. हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

महाशिवरात्री निमित्त नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. पहाटे ४ वाजता विधिवत पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देशाच्या विविध राज्यातून लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT