विखे पाटील मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टिका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली होती.. त्यांच्या या टिकेला सुजय विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिलंय.. शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात हे आम्हाला नवीन नाही.. देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देवो असं सुजय विखे यांनी म्हटलंय..
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे येथे दरवर्षीप्रमाणे चैत्र पौर्णिमा निमित्त संध्याकाळच्या सुमारास बारा गाड्या ओढण्यात आल्या. खोबरं भंडाराची उधळण करत शिंगवे येथील रवींद्र गोरख वरे यांनी या बैलगाड्या ओढल्या. या वेळेस पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या ठिकाणी चैत्र पौर्णिमेअगोदर सतत सात दिवस खंडेराव महाराजांचा जागर गोंधळ देखील करण्यात आला.
कार्यकर्त्याला घरी पाठवून फोनवरून केली शिवीगाळ
कार्यकर्त्याचा सीसीटीव्ही देखील आला समोर
लेखापाल गणेश पगारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार
केळी बागांचे तसेच कापणीवर आलेल्या गव्हाचं आणि मक्याचं नुकसान
कॉलेजच्या क्लासला चालले, सांगून घरातून निघालेली तरुणी परतली नाही, नातेवाइकांनी राजगुरुनगर पोलिसांत बेपत्ता तक्रार नोंदवली
पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात तर सोबतची बँग बाजुच्या विहिरीत मिळून आलेत
राजगुरुनगर येथुन बेपत्ता झालेल्या युवतीचा खुन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
हिंगोलीच्या बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोल्डा परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बाळापूर पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह बाळापूर येथील रुग्णालयात शविच्छेदनासाठी दाखल केला आहे.
दरम्यान, हा तरुण मद्य प्राशन करून रस्त्याच्या कडेला पडला होता.
तापमानामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभागप्रमुख अनंत पाताडे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता त्यांना उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे.
24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 1500 रुपयांनी वाढ झाली आहे...
सोन्याचे दर GST सह 95 हजार 900 रुपये तर चांदीचे दर 99 हजार रुपयांवर पोहोचले आहे...
जळगावच्या सराफ बाजारात सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे
सोन्याचे आजचे दर 95 हजार 900 हे जळगावच्या. सराफ बाजाराच्या इतिहासातले विक्रमी आहेत...
- ढोकळवाडी वारक येथे झाला गोळीबार
- सोपान चिंधु ढोकळे यांच्यावर गोळीबार. गोळीबारात ते गंभीर जखमी
- गोळी कानामागुन चाटून गेल्यामुळे मोठा रक्त स्राव. ढोकळे यांच्यावर रुग्णालयात उपचार.
- या प्रकरणी पुतण्या नवनाथ नामदेव ढोकळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकळवाडी वारक येथे सोपान ढोकळे यांच्या वडिलोपार्जित घराजवळ शेतामध्ये शेड बांधण्याकरता बांधलेल्या फाउंडेशनचा राग नवनाथ याच्या मनात होता. त्यावरून त्यांच्याकडील छर्र्याच्या बंदुकीतून त्याने सोपान ढोकळे यांच्यावर गोळीबार केला.
अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या संदर्भातला मेल पाठवल्याची माहिती..
जिल्हाधिकारी यांना जीवे मारू असा मेल मधील आशय असल्याची माहिती....
*मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकारी यांना पाठवला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
पोलिस अधिक्षक यांनी घटनेला दुओजोरा दिला आहे
- महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगत काल तिघे जण पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या सरस्वती कॉम्प्रेस या शॉपिंग सेंटर मध्ये आले होते.
- या तिघांनी एका दुकानदाराला गंडवत तुम्ही विज चोरी केली आहे तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू असे दम बाजी करत त्याच्याकडून पैसे उकळत असताना सतर्क नागरिकांनी या तिन्ही भामट्याला चोप देण्यास सुरुवात केली
- यातील दोन भामटे हे पळून गेले असून एका भामट्याला नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनच्या हवाली दिली आहे.
पंढरपुरातील प्रस्तावित काॅरिडाॅर विरोधात स्थानिक दुकानदारांनी स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे.
पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये 934 मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिका दुकानदार व मालमत्ता धारकांनी विरोध केला आहे.
विजय मोरे असे रिक्षा चालकाचे नाव
सावकाराच्या जाचा बाबत चिट्ठी लिहून गळफास घेत केली आत्महत्या
खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकार सचिन दळवी आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल
पोलीस तपास सुरू
- चंपा नावाच्या महीलेस तीन लाख रुपयांना बांगलादेशी अल्पवयीन मुलीची विक्री
- पुण्यातील तुळशीबाग परीसरातील एका खोलीत विक्री करण्यात आलेल्या मुलीला ठेवलं होतं डांबून
- बांगलादेशी असल्यानं तु बाहेर गेल्यास पोलीस तुझ्याविरोधात कारवाई करतील. अशी धमकी या मुलीला देण्यात आली होती.
- या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जवळपास 100 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी बागांना वादळी वाऱ्याचा फटका....
वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी बागांचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी...
शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी...
अगोदरच केळीचे दर कमी झाल्याने आणि आता वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत....
नाशिकच्या येवला शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे.
येवला- मनमाड महामार्गावरील धानोरे शिवारातील 51 फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
सकाळच्या सुमारास भव्य हनुमानाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून यावेळी महाआरतीनंतर हनुमान चालीसाचे पठण करत श्री हनुमान की जय ,बजरंग बली की जय , अशा जयघोष करत हनुमान जन्मोत्सव येथील भाविकांनी साजरा केला.
विशेष म्हणजे या मार्गावरून जाणारे प्रवासी हमखास या मारुतीच्या दर्शनाला थांबत असतात.
ठाण्यातून बोरिवली चा दिशेने होणार्या भुयारी मार्गामुळे ठाण्यातील घोडबंदररोड वरील मुल्ला बाग परिसरातील नागरिक रस्तावर उतरले आहेत. प्रकल्पाला विरोध नाहिये पण पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. या साठी स्थानिकांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे. या ठिकाणी टोल नाका देखील होणार आहे. परंतु या ठिकाणचा नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे होते आशी स्थानिकांची मागणी आहे
Maharashtra Breaking Live Marathi Headlines
आज हनुमान जयंती.. हनुमानाचा जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हर्षल लासात साजरा करण्यात येत आहे जिल्ह्यातील नांदुरा येथील जगातील सर्वात उंच अशी १०७ फूट हनुमानाच्या मूर्तीला सकाळी जलाभिषेक करून हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली . राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा शहराजवळच असलेल्या 107 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातही भाविक सकाळपासूनच गर्दी करत आहे अतिशय विशाल काय अशी ही मूर्ती असून राज्यभरात प्रसिद्ध आहे ..
लोणावळा शहराच्या उत्तरेकडील डोंगरावरील उंच गुफेमध्ये हनुमानाचे मंदिर आहे. याच मंदिराच्या नावावरून डोंगराच्या मध्यावर असलेल्या वस्तीला हनुमान टेकडी असे नाव पडले आहे. भांगरवाडी येथील नागरिक व हनुमान टेकडी येथील नागरिकांच्या वतीने हनुमान टेकडी येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाविकांनी सकाळपासूनच या डोंगरावर दर्शनासाठी गर्दी केली होती.
नवी मुंबई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी नवी मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून नवी मुंबईतील कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेल मध्ये मनपा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. याचा तीव्र निषेध मनसेच्या वतीने नोंदविण्यात आलाय. मनपा मुख्यालयात असणारे सभागृह तसेच अनेक बहुउद्येशीय इमारतीमध्ये असणारे सभागृह या कार्यशाळेसाठी न घेता पांचतारांकित हॉटेलमध्ये कार्यशाळा घेण्याचा घाट का असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय. सर्व सामन्यांच्या सरकार मधे जनता उपाशी आणि अधिकारी तुपाशी अशी अवस्था झाली असल्याची जळजळीत टीका यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलेय.
सोलापूरच्या शहर गुन्हे शाखेचा पोलिसांनी केली अटक
पोलीसांनी डमी प्रवाशी पाठवून केला पर्दाफास
मल्लिकार्जुन अळगुडगी असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव
मल्लिकार्जुन अळगुडगी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची मिळाली पोलीस कस्टडी
या प्रकरणात अपंगत्वाचे प्रमाणपत्र किती जणांनी घेऊन एसटीने प्रवास करत आहेत याचा तपास सुरु
याबाबत पोलीस कर्मचारी रजपूत यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती फिर्याद
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली.
- काल रात्री विद्यार्थ्यांनी पुण्यात केलं होतं अचानक आंदोलन
- रात्रीच्या आंदोलनानंतर आज सकाळी विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या भेटीला
- शरद पवारांसोबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अर्ध्या तास केली चर्चा
- शरद पवारांचा विद्यार्थ्यां समोरूनच MPSC आयोगाच्या अध्यक्षांना फोन
- शरद पवारांनी रजनीश शेठ यांच्याशी फोनवरून केली चर्चा
- रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांना दिली भेटीची वेळ
- MPSC विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू रजनीश शेठ यांच्याकडून शरद पवारांना फोनवरून माहिती
जालना: जालना शहरातील मोतीबाग परिसरातील उंच झाडावर चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केल आहे. सुखदेव चंद अस आंदोलक तरुणाचे नाव आहे.अंबड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या 302 च्या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करत त्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी या तरुणाने आंदोलन सुरू केलय. दरम्यान पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या अंजनेरी पर्वतावर मधमाशांनी भाविकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे आज हनुमान जयंती असल्याने हनुमानाचा जन्मस्थान असलेल्या अंजनेरी येथे भाविक गर्दी करत असतात आज मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती अंजनेरी पर्वतावर जात असताना यावेळी मधमाशांचे पोळ फुटले आणि महिला पुरुष बालकांचे 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिव पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर ते दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेह भोजनास येणार आहेत. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्य व केंद्रीय मंत्री मंडळातील मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहे. अमित शाह यांच्या तटकरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याचा कुठलाही राजकीय संबंध नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- पुणे , सोलापूर आणि आहील्यानगर जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणार्या उजनी धरणाची मृतसाठ्याकडे वाटचाल
- उजनीत केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक
- उपयुक्त पाणीसाठा केवळ ७ टीएमसी एव्हढाच शिल्लक
- तब्बल ६३ टीएमसी मृतपाणीसाठा शिल्लक
- आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपुन उजनीत मृत पाणीसाठाच शिल्लक राहणार
- त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परीसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार
- सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरु आहे. हे काम जाणीवपूर्वक रखडवन्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या रेल्वेच्या दगडी पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात हलवला असून सदर व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरात काल सायंकाळी सगळीकडे हनुमान जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना भावसिंगपुरा परिसरातील पाटील खोऱ्यातील चिरीखाना हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला. पुजाऱ्याकडून घटनेची माहिती मिळताच या भागातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सणसवाडी येथे रुग्णवाहिका व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्णासह रुग्णाचे दोघे नातेवाईक आणि अन्य तिघे असे सहा जण गंभीर जखमी झाले होते. यात रुग्णाच्या एका नातेवाईकाचा व दुचाकी वरील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादच्या भाद्रमारोतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मध्यरात्री पासून रांगा लागल्या आहेत. प्रसिद्ध भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रात्री अनेक हनुमानभक्त 'जय भद्रा'चा जयघोष करीत वेगवेगळ्या भागातून खुलताबाद येथे दर्शनासाठी पायी दाखल झाले आहेत. नवसाला पावणारा दक्षिणमुखी हनुमान म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी येत असतात. हनुमान जयंती निमित्त एक दर्शनाची पर्वणी असते. त्यामुळे आज दिवसभर हनुमान भक्ताची मोठी गर्दी खुलताबाद मध्ये असणार आहे. मंत्री अतुल सावे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत आज पारंपरिक पद्धतीने आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर सुरू करण्यात आला आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त येणार आहे. महिनाभरापासून खुलताबादच्या कबरीवरून वाद उफाळून आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष ती खबरदारी घेतली आहे.
पहाटे सुर्योदयाच्या वेळीच गावातील पवनपुत्र हनुमान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. "पवनसुत हनुमान की जय!" च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.या मंगलप्रसंगी मंदिरात महापूजा आणि आरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या पवित्र ध्वनीत भाविकांनी प्रभु हनुमंताचे दर्शन घेतले. गावातील लोकांसह अनेक बाहेरील भाविकांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून श्रद्धेची प्रचिती दिली.चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून संपूर्ण देशात साजरी केली जाते. भक्ती, निष्ठा आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या या उत्सवाने चांडोह गावात धार्मिकतेचा आणि भक्तिभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला
कात्रज आगम मंदिर येथे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
त्यामुळे येत्या गुरुवारी (१७ एप्रिलला) शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही दुरुस्तीची कामे झाल्यानंतर शुक्रवारी (१८ एप्रिलला) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जुलै ऑगस्ट २०२५मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, आता शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समितीने केली होती. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास आणि तिच्यावर उपचार करण्यास विलंब झाला किंवा कसे, याबाबतचा अहवाल समितीने तयार केला असून, तो केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे २४ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत.
राज्यात ११ एप्रिलपर्यंत उष्माघाताचे ३४ रुग्ण आढळून आले असून, त्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ६ रुग्ण आहेत. नागपूर, गडचिरोली, परभणी प्रत्येकी ४ रुग्ण, जालना ३, लातूर, नाशिक, पालघर, वर्धा प्रत्येकी २ रुग्ण आणि नांदेड, धाराशिव, सांगली, ठाणे, रायगड प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
विमान कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना सहा तास पुणे विमानतळावर बसावं लागलं. पुणे ते लखनऊ 6E0338 हे विमान आधी दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी 12.55 वाजताचे होते. ते रद्द करून रात्री 00.10 वाजता म्हणजे 12/04/2025 रोजी करण्यात आले.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी काल प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आले.. यावेळी गळ्यात निळे दुपट्टे,हातात मशाल व भगवा झेंडा घेऊन यावेळी रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं, यावेळी स्वतः रवी राणा यांनी प्रहार संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारलं, तर यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी बच्चू कडूंना टोला लगावला.. शेतकऱ्यासाठी अपंगासाठी आम्ही पूर्ण ताकतीने सोबत आहे पण खूप उशिरा जाग आली,बच्चू कडू स्वतः मंत्री होते सरकार मध्ये होते उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ते होते..सत्ता मध्ये असताना गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण उशीर झाला तरी पण त्याच्यासोबत आहे असा टोला रवी राणा यांनी लगावला.
रात्री बारा वाजता हातात पेटती मशाल घेऊन शेकडो शेतकरांन सह प्रहार कार्यकर्त्यांच्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरावर मोर्चा नेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमचे सरकार आले तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे अशाश्वसन दिले होते. त्या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे एमआरजीएस मधून करावी, दिव्यांगाना प्रति महिना 6000 हजार रुपये मिळावा या मागण्यांना करिता आमदार च्या घरावर मशाल मोर्चा काढला.
शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांसाठी राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.. मंत्री विखे निवासस्थानी नसल्याने त्यांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.. यावेळी आंदोलकांनी विखे पाटलांच्या घरासमोर अपना भिडू बच्चू कडू... शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे... अशा घोषणा दिल्या..
शेतकरी कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटने कडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले आहे. तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांने गनिमी काव्याने टेंभा- मशाल आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी प्रहार च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हातात मशाल आणि गळ्यात भगवा व निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावा,अशी मागणे घेऊन हातात मशाल घेऊन हे टेंभा आंदोलन करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.