Maharashtra Winter Session Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Winter Session: ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, शनिवार-रविवारीही कामकाज राहणार सुरू; नागपुरात धडकणार ३३ मोर्चे

Maharashtra Government: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून सुरूवात होईळ. १४ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. महत्वाचे म्हणजे शनिवार-रविवारही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार आहे.

Priya More

Summary -

  • महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरदरम्यान नागपूरमध्ये पार पडणार

  • शनिवार-रविवारलाही दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार

  • नागपूरमध्ये ३३ मोर्चे धडकणार आहेत

  • ७ हजारांहून अधिक पोलिस अधिवशेनासाठी तैनात

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हे अधिवशेन होणार आहे. महत्वाचे म्हणजे शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहाचे कामकाज होणार आहे. हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थानापासून विधिमंडळ परिसर असलेल्या सिव्हिल लाईन्स भागात पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी शहर आणि बाहेर जिल्ह्यातील ७ हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. आधुनिक सुविधा असलेली ५ सुसज्ज दक्षता वाहने, गृहरक्षक दल, बॉम्ब शोधक, नाशक पथकासह विशेष कमांडो सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहेत. मंत्री आणि नेत्यांच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलिस फौजफाटा नागपुरात येण्यास सुरुवात झाली आहे. अधिवेशनात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जातात त्यासाठी पोलिस बंदोबस्त असणार आहे.

यंदा अधिवेशनाचा कालावधी ८ दिवसांचा असले तरीही राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. यामध्ये उपायुक्त स्तरावरील १० अधिकारी , सहाय्यक उपायुक्त ३४ अधिकारी, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक २०० अधिकारी, २१०० पोलिस अंमलदार टप्प्याटप्याने शहरात दाखल होत आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.

८ डिसेंबरपासून नागपुरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ३३ मोर्चे धडकरणार आहेत. २२ संघटनांनी धरणे आंदोलन तर १७ संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली. अधिवेशनाच्या एक दिवस आधी दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समितीने मोर्चा काढण्याची परवानगी मागितली. एकाने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. आणखी मोर्च्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: मोठी बातमी! BMC निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Navi Mumbai Tunnel: नवी मुंबईचा कायापालट होणार, पाम बीचखालून जाणार भुयारी मार्ग; नेमका प्लान काय?

Liver cancer: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर लवकरच खराब होणारे; दुर्लक्ष केल्यास कॅन्सरही होऊ शकतो

Muesli Benefits: नाश्त्याला मुसली खाण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT