Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : पुण्यासह १२ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पावसाच्या सरी; हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’

Yellow Alert in Maharashtra : हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Ruchika Jadhav

राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. यासह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. मुंबई पुणे अशा शहरांमध्ये नागरिक उन्हामुळे त्रस्त झालेत. अशात आज शनिवारी पुण्यासह अन्य १२ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘यलो अलर्ट’

हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. हवामान खात्याने पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, धुळे, जळगाव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

शनिवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली येथे पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर मराठवाड्यातील विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, नांदेड येथे वादळी वारे, विजांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक तापमान

राज्यात आज सर्वाधिक तापमान अकोल्यात ४४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालीये. त्यामुळे कर्नाटक, दक्षिण तमिळनाडू येथे वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT