Maharashtra Rain News IMD Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather News: धुवांधार बॅटिंगनंतर आता विश्रांती! राज्यात पावसाचा जोर ओसरणार; कसं असेल हवामान? वाचा सविस्तर...

Maharashtra Rain News IMD Alert: राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र आता आजपासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून राज्यामधील पावसाचा जोर कमी होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मध्य भारतामध्ये कमी दाबाचे क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस पाऊस विश्रांती घेणार असून पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवारपासून (ता. १६) विदर्भात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. आज (ता. १३) राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काल (गुरुवार,ता. १२) महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच कोकण, मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र आजपासून राज्यात आठवडाभर पाऊस विश्रांती घेणार असून पुढील आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात विदर्भामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. या मुसळधार पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. त्यामुळेच पावसाचा जोर कमी होण्याची बळीराजा वाट पाहत होता. अशातच हवामान खात्याने पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT