Maharashtra Winter Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी! निफाड सर्वात थंड, विदर्भही गारठला

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यभरात गारठा कायम राहणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - राज्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड पुन्हा गारठून निघाले आहे. निफाडमध्ये (Nashik) थंडीचं पुनरागमन झाले आहे. तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. आज निफाडमध्ये ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात बदल होत असून तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. तर नाशिकमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. तर कुठे पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.  पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यभरात गारठा कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. काडकाच्या थंडीमुळे (Winter Season) ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.

विदर्भात हुडहुडी, पारा 8.8 अंशापर्यंत घसरला

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्हे गारठले आहे. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 8.8 अंशावर गेल्यानं हुडहुडी वाढली आहे. गोंदिया विदर्भातील सर्वात थंडगार जिल्हा ठरला आहे. थंडीचा जोर अधिकचा वाढल्यानं जिल्ह्यतील अनेकजन शेकोटीचा सहारा घेत आहेत. तसेच उबदार कपड्याचाही वापर कर आहे. तर नागपूरतही प्रथमच पारा 10 अंशाच्या खाली पोहचला आहे. आणखी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचाने व्यक्त केला आहे.

औरंगाबाद गारठले पारा 7.9 अंशावर

उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण औरंगाबाद शहर गारठले आहे. शहराच्या किमान तापमानात एका दिवसात 5.5 अंशांची घसरण होऊन पारा 7.9 अशांवर पोहोचला आहे. यामुळे सर्वत्र धोक्याची चादर पसरल्याचे दिसून येतंय. मागील आठवड्याभरापासून शहराच्या तापमानात सतत बदल होत आहे. चार दिवसांपूर्वी शहरा ढगाळ वातावरणासह उकाडा अशी स्थिती होती. परंतु गुरुवार दुपारपासून वातावरणात अचानक बदल होण्यास सुरुवात झाली, तर सायंकाळपासून पूर्ण शहर गारठले. किमान तापमान 13 अंशावरून अचानक खाली आले. उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे हा परिणाम काही तासात शहरात जाणवण्यास सुरुवात झाली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HUL Price Hike: कपडे धुणं आता महागणार! Surf Excel, Rin आणि Wheel महागले; साबणाच्या किमतीतही वाढ, पाहा नवे दर

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बळीराजा दिन साजरा

सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच का गुंडाळले जातात? जाणून घ्या कारण

Death News: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध सिनेनिर्मात्याचं निधन; सेटवरच घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वात शोककळा

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले शरद पवार...

SCROLL FOR NEXT