Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात किमान तापमान वाढले, विदर्भात पावसाची शक्यता, आज कुठे कसं हवामान?

Maharashtra weather forecast: उत्तरेकडील राज्यातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आजही तापमानात वाढ पाहायला मिळेल. आज विदर्भात पावसाची शक्यता आहे.

Priya More

राज्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत आहे. राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारठा कमी होत उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात आजही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील राज्यातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सकाळच्या सुमारास गारठा आणि दाट धुके पाहायला मिळत आहे. तर दुपारी कडक ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण झाले आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात येत्या २४ तासांमध्ये किमान तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आकाश ढगाळ राहून विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर उर्वरीत महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहिल. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. उत्तर भारतात १५५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे.

राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. किमान तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम हिमालयीन भागात पश्चिमी चक्रावात तयार झाला असून पुढील चार दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबसह महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT