Maharashtra Rain Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather News: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Latest Weather Forecast For Maharashtra: हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे.

Priya More

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे. अशामध्ये नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

आज आणि उदया महत्वाचा -

मुंबई हवामान खात्याने आज आणि उद्याच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मंगळारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर बुधवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मंगळवारचा हवामानाचा अंदाज -

मंगळवारी रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, जालना, परभणी, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बुधवारचा हवामानाचा अंदाज -

बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगील, सोलापूर, सातारा, बीड, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटा, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT