Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात पावासाचा जोर कमी झाला होता. पण आता पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आहे. हवामान खात्याने ६ जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

  • आज सहा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

  • पुणे, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

  • रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली आणि गोंदियात देखील मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात सध्या पावासाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढत आहे तर काही जिल्ह्यात कमी पाऊस पडत आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असून हवामान विभागाने ६ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, पुणे, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि साताऱ्यातील प्रशासनाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आज पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये मध्यम आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रत्नागिरीला येलो अलर्ट जारी केला आहे. तर आज सिंधुदुर्गमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

ज्ञानेश कुमारांकडून भाजपच्या तिकीटाची ऑफर; केरळच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT