Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather: मुंबईत पावसाची विश्रांती, उकाडा वाढला; विदर्भाला येलो अलर्ट; आज कुठे कसं हवामान?

IMD Alert For Maharashtra: राज्यातील अनेक ठिकाणी आज पावसाने विश्रांती घेतली आहे. पण विदर्भाला आज पाऊस झोडपून काढणार. विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Priya More

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने राज्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. मुंबई-पुण्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील राज्यभरात सगळीकडे जोरादार पाऊस झाला. आज देखील राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कायमच राहणार आहे. हवामान खात्याने आज विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर, मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर याठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी उकाडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. आज मुंबई आणि कोकणात तापमानात काहिशी वाढ होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी केव्हा तरी मधून अधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांचे तर उकाड्यामुळे पुन्हा हाल होऊ लागले आहे. घामांच्या धारामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

दरम्यान, पुढचे ३ दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी महत्वाचे राहणार आहेत. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ मे ते २ जून या कालावधीमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरादर पावसाची शक्यता आहे. इथे अनेक ठिकाणी पावसाची ये-जा सुरूच राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT