El nino impact india  AI Image
महाराष्ट्र

El Niño : 'एल निनो'ने महाराष्ट्राची चिंता वाढवली, पावसानंतर आता हिवाळ्यावर परिणाम होणार, तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

El Niño Impact on Maharashtra : महाराष्ट्रात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून नाशिक, पुणे आणि मुंबईतील किमान तापमानात घट झाली आहे. मात्र, एल निनोचा यंदाच्या हिवाळ्यावर परिणाम होणार का? उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी वाढणार का? तज्ज्ञांनी काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घ्या सविस्तर.

Namdeo Kumbhar

El Niño impact on Maharashtra winter season : दिवाळी संपल्यानंतर महाराष्ट्रात सध्या गुलाबी थंडीची जाणीव होऊ लागली आहे. नाशिकमधील निफाडमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद जाली आहे. निफाडमधील तापमानाचा पारा फक्त ११ अंशावर आहे. राज्यातील बहुतेक शहरांच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. आता थंडीला सुरूवात होईल, असे सांगण्यात येत आहे. पण पावसाळ्यासारखाच 'एल निनो'चा हिवाळ्यावरही परिणाम होणार का? अशी चिंता वाढली आहे. (El Niño Impact on Maharashtra Winter? Experts Explain Weather Forecast)

सध्या तुमच्या शहरात गुलाबी थंडीची जाणीव होऊ लागली असेलच. पण तरीही वर्षाच्या शेवटी 'एल निनो' (El Niño) चा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात कडक थंडी पडणार की हिवाळा उबदार राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, एल निनोचा मुख्य परिणाम पावसावर होत असला तरी, महाराष्ट्रातील थंडी प्रामुख्याने स्थानिक वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहावर अवलंबून असते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक शहरातील किमान तापमान कमी होत आहे. सकाळीच्या वेळी तापमानात घट होत असल्याने यंदा हिवाळा चांगला असेल असे संकेत मिळत आहेत. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत १९.२°C किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान दररोजच्या तापमानापेक्षा २.४°C ने कमी होते. तर पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये १२-१३°C च्या आसपास किमान तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, बारामतीमध्ये ११.९°C हे या भागातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, सकाळी आकाशात धुकं राहील आणि दुपार व संध्याकाळच्या सुमारास आकाश निरभ्र होईल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २०°C राहील.

पुढील काही दिवसांत पुणे आणि मध्य महाराष्ट्रात रात्री थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवस-रात्रीच्या तापमानात मोठा फरक राहू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तीव्र थंडीची लाट येऊ शकते. विदर्भातील नागपूर व आसपासच्या परिसरात हिवाळ्यातील किमान तापमानात मोठी घट होऊ शकते. तर मुंबई आणि कोकणात सागरी प्रभावामुळे थंडी कमी होते, तरीही उत्तरेकडील किंवा ईशान्येकडील वारे सतत वाहत राहिल्यास काही काळासाठी थंडीची लाट येऊ शकते, असे कपाडिया यांनी freepressjournal ला सांगितले.

एल निनोचा परिणाम हिवाळ्यासाठी थेट विचारात घेऊ नये. त्याचा परिणाम प्रामुख्याने मान्सूनवर होतो. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी हिवाळा हा पश्चिमी वाऱ्यांच्या प्रवाहावर आणि ईशान्येकडील पावसावर अवलंबून असतो, असे आयएमडी मुंबईचे माजी संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले.

कोरड्या आणि थंड हवामानामुळे मुंबई आणि महानगर परिसराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्यम श्रेणीत कायम आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार रविवारी मुंबईचा एकूण AQI १३६, नवी मुंबईचा १३३ आणि ठाण्याचा ११३ होता. सर्वात खराब AQI नोंदवलेल्या केंद्रांमध्ये नेव्ही नगर-कुलाबा (२४३), घाटकोपर (१८२), चेंबूर (१६८), देवनार (१९७) आणि मालाड पश्चिम (१६४) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra For Mirror: घरात आरसा कोणत्या भिंतीवर लावावा? 'या' ठिकाणी चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर अमित शाह यांच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये दाखल

Shocking: अवकाशातून शेतात कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, सांगलीकर प्रचंड घाबरले; पाहा VIDEO

Type 2 Diabetes: घरच्या जेवणानेही होऊ शकतो टाईप-2 डायबेटीस; काय आहे कारण? तज्ज्ञांनी सांगितलं कोणाला अधिक धोका

5 Detox Drink For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 5 डिटॉक्स ड्रिंक्स, घरी बनवण्याची रेसिपी सोपी

SCROLL FOR NEXT