Ashadhi Ekadashi weather forecast Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : आषाढी एकादशीला वरुणराजा बरसणार का? ४ दिवसाचा अंदाज आला समोर, IMD चा अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?

IMD Maharashtra, Ashadhi Ekadashi weather : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने २५ ते २८ जुलैपर्यंतचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. पुणे घाटमाथा, कोकण आणि काही विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Ashadhi Ekadashi weather forecast Maharashtra : आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी सज्ज झाले आहेत. राज्यभरातून भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. लाखो वारकरी पंढरीत विठु माऊलीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. त्यातच सर्वांचे लक्ष वरुणराजाकडे लागले आहे. एकादशीला राज्यात पाऊस पडणार का? पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण अद्याप अनेक भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे एकादशीपासून तरी पावसाला सुरूवात होणार का? असे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत.

मुंबई वेधशाळेने २५ ते २८ जुलै दरम्यानचा पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२५ जुलै

पुण्याला ऑरेंज, तर मुंबई-कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाटमाथा, रायगड आणि सातारा घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट आणि कोल्हापूर घाट भागात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य पावसाचा अंदाज आहे.

२६ जुलै:

ऑरेंज अलर्ट: पुणे घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट कायम आहे.

यलो अलर्ट: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२७ जुलै: पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यांतील घाटमाथ्यासह विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२८ जुलै : सातारा घाट, रत्नागिरी तसेच विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट राहील.

नागरिकांना महत्त्वाच्या सूचना -

पुण्याच्या घाटमाथ्यावर आणि कोकणात २५ आणि २६ जुलै दरम्यान पावसाचा जोर जास्त असणार आहे. त्यामुळे वारीसाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांनी आणि पर्यटकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष बैठकांचा धडका

KDMC Hospital: प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला बांधला पुठ्ठा; केडीएमसी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

चमोली बोकद्यामध्ये मोठी दुर्घटना; मातीचा ढिगारा आणि पाणी शिरलं, अनेक कामगार अडकले

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

SCROLL FOR NEXT