Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather: पाऊस की उष्णतेची लाट? पुढील २४ तासांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता

Weather Report: पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू प्रदेशात पुढील २४ तासांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकासह काही राज्यांत उष्णतेची लाट येऊ शकते. पश्चिमी विक्षोभामुळे तापमान घटण्याची शक्यता आहे.

Dhanshri Shintre

गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात बदल जाणवला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, आसाम आणि मेघालयातील पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. दिल्लीतही तापमानात २.४ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुढील २४ तासांत वायव्य भारतातील कमाल तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे तापमान पुन्हा २ ते ४ अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहील, परंतु त्यानंतर तापमानात घट होऊ शकते. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी जम्मू आणि हिमाचल प्रदेशात वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाबमध्येही गारपीट होऊ शकते. हवामान खात्याने जम्मू, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उत्तराखंडसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विदर्भातील सर्वाधिक तापमान

मध्य उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम मध्य प्रदेश, आसाम आणि मेघालयात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भातील अकोला येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे सर्वाधिक होते.

पश्चिमी विक्षोभामुळे सोमवारी देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन भागांत जोरदार हिमवृष्टी होऊ शकते, तर कर्नाटकच्या काही किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

सध्या हवामानात झपाट्याने बदल होत असून, दुपारी वाढलेले तापमान आणि सकाळ-संध्याकाळी गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज रुग्णालयांत अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या काळात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि अन्य त्रास होऊ शकतात. तळलेले पदार्थ टाळावेत, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेटेड ठेवावे. लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT