MAHARASHTRA WEATHER UPDATE: OCTOBER HEAT INTENSIFIES saam tv
महाराष्ट्र

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Maharashtra October Heat : राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान आणि हवामानाची स्थिती.

Namdeo Kumbhar

Maharashtra October heat weather update today : राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. पावसाने विश्रांती घेताच आता 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा बसू लागला आहे. आज (५ ऑक्टोबर) मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर प्रचंड उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागात 'येलो अलर्ट' जारी केला आहे. (Mumbai Konkan yellow alert weather forecast)

कोकणात उकाडा, उर्वरित राज्यात कडक ऊन

पाऊस थांबल्याने राज्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान प्रचंड दमट आणि उष्ण राहणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मुख्यत्वे आकाश निरभ्र राहून कडक ऊन आणि उकाडा वाढेल.

पुण्यात तिहेरी हवामान

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या पुणेकर एकाच वेळी तीन प्रकारच्या हवामानाचा अनुभव घेत आहेत. दुपारी कडक ऊन, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री किंवा पहाटे गारवा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरात तापमान ३५ अंशांवर

विदर्भातही ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. नागपुरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या तापमानात घट असा बदल नागपूरकर अनुभवत आहेत. या संपूर्ण महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : मालेगाव ३८.४, अमरावती ३८, डहाणू ३७.९, रत्नागिरी ३७.७, ‎जळगाव ३७.५, सांताक्रूझ ३७.४, अकोला ३७.१.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT