Maharashtra news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. इतर राज्यात उन्हाचा चटका लागत आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पावसाचा जोर कमी, तापमानात वाढ सुरू

  • मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता

  • चंद्रपूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश तापमानाची नोंद

  • सकाळी घाटमाथ्यावर आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्याचे साम्राज्य

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला असून उन्हाचे प्रमाण वाढू लागले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हे हवामान बदल प्रकर्षाने जाणवू शकतात. मात्र राज्यातील उर्वरित भागात मुख्यतः पावसाची उघडपी राहील आणि हलक्या तुरळक सरी कोसळतील, असे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत पावसाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला होता. राज्यात तापमानात हळूहळू वाढ होऊ लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. चंद्रपूर येथे काल राज्यातील सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

यामुळे उष्णतेची चाहूल लागली असून दिवसाच्या वेळी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. सकाळच्या वेळी मात्र दाट धुक्याने वातावरण आच्छादलेले असते. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी सकाळी उशिरापर्यंत पांघरूण घातल्यासारखे धुक्याचे साम्राज्य दिसले.

पुढील काही दिवसांमध्ये पावसाने राज्याला काहीशी उघडपी राहणार आहे. दरम्यान, मान्सून हंगामाच्या अखेरीस हवामानामध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सुरक्षतितेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT