Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather Forecast Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट कायम; कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा

Rohini Gudaghe

राज्यात वादळी पावसाच्या सरी कोसळत असतानाच उन्हाचा चटका असह्य होत आहे. राज्यातील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पार गेलं आहे. आज १९ एप्रिल रोजी (Maharashtra Weather Forecast) राज्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीचं संकट कायम आहे. या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला (Weather Update) आहे.

हवामान विभागाने पुढील ७ दिवस राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. २१ आणि २२ तारखेला कोकण गोव्यामध्ये आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता (Maharashtra Weather Update) आहे. पुण्यात १८ एप्रिल रोजी ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ते मागील ११ वर्षातील र्वाधिक तापमान होते. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३४ अंश आहे.

१८ एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव आणि बीड येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली (Maharashtra Weather) आहे. उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार पोहचला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास देखील जाणवत आहे. नागरिक उकाड्यामुळे हैराण झालेले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सांगावी बुद्रुक गावात वादळी वऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सांगवी परिसरातील अनेकांच्या (Unseasonal Rain) घरावरील पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मात्र, उष्णतेने हैराण झालेल्या गावकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील सांगावी बुद्रुक गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी (Heat Wave) पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानासाठी आयएमडीने येलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, चंद्रपूर, (Maharashtra Weather Update Today) गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी अपडेट; वाहनाची टाकी फुल करण्याआधी वाचा आजचे दर

Special Report : Amol Kolhe | हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार? संसदेत कोल्हे जाणार की आढळराव?

Special Report : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर

Shirur Loksabha: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील CCTV बंद; २४ तासांनंतर पुन्हा सुरू

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये वीज पडून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT