Maharashtra Weather Forecast Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: राज्यात एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा कायम

Weather Forecast Today: राज्यात सध्या उन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. एकिकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Forecast Todays Update

राज्याच्या हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतोय. उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वर चढत आहे. तर, महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता (Rain) वर्तविली जात आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील २४ देशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. राज्यात सध्या उन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसत (Maharashtra Weather Forecast) आहे. एकिकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.  (Latest Weather Update)

हवामान खात्याने पुढील २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांचा पारा ओलांडला आहे. आज सध्या राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला (Maharashtra Weather)आहे. आज अकोला येथे देशातील उच्चांकी म्हणजेच ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमाल तापमान चाळिशी पार गेल्याने राज्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत आहे. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्यामुळे विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान (Weather Forecast Today) चांगलंच वाढलं आहे. हवामान विभागाने आज देखील विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

देशाच्या काही भागात पाऊस पडत आहे,तर दुसरीकडे काही भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती दिलीय. मुंबईसह पुण्याच्या तापमानात देखील मोठी वाढ झाली (Weather Forecast) आहे. पुणेकरांना उन्हाच्या तीव्र झळा बसत आहे.

कोल्हापुरात पावसाची हजेरी

हवामान खात्यांने वर्तवलेल्या अदांजानुसार आज कोल्हापूर परिसर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेचा पारा वाढत असताना सायंकाळी अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचं चित्र (Summer) आहे. आज आणि उद्या नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर

आज पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि (Maharashtra Weather Update) भारताच्या वायव्य लगतच्या मैदानी भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासांत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

SCROLL FOR NEXT