Weather Forecast 14 April : राज्याला पुन्हा एकदा गारपीटीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी वर्तववलेल्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून पुढील चार दिवस कोकणासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण असेल. तसेच राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात राज्यभात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीना सामना करावा लागला. विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळाची तडाखा बसला होता. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. आज १४ एप्रिल रोजी हा अलर्ट देण्यात आलेला असून १५, १६ एप्रिल रोजीही काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलाय.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या ट्वीटमध्ये पिवळ्या इशाऱ्यांसह दर्शविल्या गेलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.
ज्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तिथे वादवळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामाना खात्याकडून नागरिकांन विजेच्या धोक्यांपासून सर्व सुरक्षा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
या जिल्ह्यांना गारपिटीचा सर्वाधिक धोका
हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यात बीड आणि उस्मानाबादसह अहमदनगरलाही ऑरेन्ज अलर्ज जारी केला आहे. या भागात 14 एप्रिल रोजी गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची आणि जणावरांची काळजी घेण्याचे आवाहान करण्यात येत आहे. (Maharashtra Weather Forecast)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.