Weather Updates  Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : पुढील ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra weather alert : महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.

Namdeo Kumbhar

Unseasonal Rain Maharashtra : महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत, कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra weather alert) ६ आणि ७ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील ४८ तास राज्यात सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा (unseasonal rain Maharashtra) इशारा दिलाय. देशात जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंत उद्यापासून पाऊस कोसळणार आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर, पुण्यासह राज्यातील (IMD rain forecast) अनेक शहरासाठी पुढील ४८ तासांत यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत Mumbai rain update मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (thunderstorm warning, hailstorm forecast) वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे.

पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट yellow alert Pune

पुण्याला चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उद्यापासून पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. कडाक्याच्या उन्हात पुणेकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. पण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्याला पाच दिवस अलर्ट जारी Yavatmal alert, storm alert 6-7 May

यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसह वादळ, वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील पाच दिवस हे चित्र कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात १० मे पर्यंत शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी लागणार आहे. शेतशिवारामध्ये तीळ, ज्वारी, मुंग, आंबा, भाजीपाला फुलशेती, भुईमुंग आहे. यातील तीळ, ज्वारी आणि मुंग ही पिके काढणीच्या अवस्थेत आहे. याचवेळी दाखल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन काढणीला आलेला पीक संरक्षित करावे अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT