Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यात तापमानाने मोडला उच्चांक, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Forecast: आज कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Priya More

राज्यात तापमानात प्रचंड वाढत चालले आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. उन्हाचा तडाका वाढत चालल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. उकाड्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. अशामध्ये हवामान खात्याने राज्यातील कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात सोलापूरमध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाड येथे राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजेच ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरपाठोपाठ रत्नागिरी, जेऊर, सांगली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान सातत्याने ३७ अंशांच्या वर गेले आहे.

पुणे, जळगाव, कोल्हापूर, निफाड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नागपूर येथे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. राज्यातील कमाल तापमान सतत वाढत असल्यामुळे उष्णतेच्या झळा आणखी वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

आज कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर सिंधुदुर्गात हवामान सरासरीपेक्षा उष्ण आणि दमट राहणार आहे. हवामान खात्याकडून याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shani Dev: पुढच्या वर्षी शनीच्या चालीत होणार ५ वेळा बदल; शनी देव या राशींना करणार श्रीमंत

Maharashtra Live News Update: आंगणेवाडी यात्रा 9 फेब्रुवारीला होणार

Ladki Bahin Yojana: ₹३००० की ₹१५००; लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

भारताशेजारच्या ३ देशात अस्मानी संकट, १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, ८०० जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT