IMD weather warning Maharashtra  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra weather : सावधान! सोसाट्याचा वारा अन् वि‍जांचा कडकडाट, ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

IMD weather warning Maharashtra : कर्नाटक किनारपट्टीजवळ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Alert: मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात धो धो पाऊस कोसळत आह. पुढील चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहणार आहे. मुंबई हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने स्थानिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

२१ मे रोजी कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचा परिमाण महाराष्ट्रात होऊ शकतो. कर्नाटक किनारपट्टीजवळ तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आयएमडीच्या हवामान अंदाजानुसार, २२ मेपासून कर्नाटक किनारपट्टीवरून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. २५ मेपर्यंत ते आणखी तीव्र होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढवेल. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मॉन्सूनपूर्व मध्यम सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. आयएमडीने यंदा मॉन्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यत आहे. तर १० तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून तळ कोकणात धडकण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होत आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. काही भागांमध्ये पाऊस जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जालिंदर साबळे, पुणे हवामान शास्त्रज्ञ

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहू शकते. मंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहील, आणि मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT