Marathwada Water Crisis Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Water Crisis: विहिरींनी तळ गाठला, हातपंप आटले, मराठवाडा, पश्चिम विदर्भात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी वणवण

Maharashtra Water Crisis Update: मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा येत्या दहा दिवसात मृत साठ्यावर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जायकवाडी धरणात केवळ साडेपाच टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, |ता. २५ मे २०२४

एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळीने धुमाकूळ घातला असतानाच मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पश्चिम विदर्भातील 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा सुरू असून दुष्काळाची सर्वाधिक झळ ही बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याला बसत आहे.

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा येत्या दहा दिवसात मृत साठ्यावर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जायकवाडी धरणात केवळ साडेपाच टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. २५ मार्च २०२४ रोजी २३ टक्के इतका पाणीसाठा होता. आज घडीला केवळ साडेपाच टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने दोन महिन्यात तब्बल १८ टक्के पाणीसाठा घटला आहे. पिण्याच्या पाणी उपश्यासोबत १.०४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

त्यामुळे येत्या दहा दिवसांत त्यात घट होऊन मृत साठ्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन मोठ्या शहरासोबतच संभाजीनगर जालना नगर जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे अधिक गावची तहान साठ्यावर भागवावी लागेल. धरणातील मृतसाठ्याची क्षमता २६ टीएमसी आहे. तो वर्षभर पुरू शकणार आहे. मात्र या साठ्यात १८ टक्के गाळच आहे. तरीही या साठ्यातून मराठवाड्याला पिण्यासाठी व उद्योगाला पाणी मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यात बाष्पीभवनाचे प्रमाण या आठ दिवसांत वाढले आहे. सध्या १.०४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

पश्चिम विदर्भातही दुष्काळाची परिस्थिती

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सूर्य आग ओकत असल्याने विहिरीने तळ गाठल्याने तसेच हातपंपही बंद झाल्याने पाण्याचे महत्वाचे स्रोत आटल्याची परिस्थिती आहे. सध्या पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक असून 86 गावात 91 टॅंकर द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच 436 विहिरीचे अधिग्रहण करून तात्पुरत्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

सांगलीमध्ये दुष्काळ

सांगलीच्या जत तालुक्यातील यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जत तालुक्यातील साडेतीन लाख पशुधन संकटात सापडले आहे. मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे,तर उपलब्ध चाऱ्याचे दर न परवडणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT