Pradnya Satav latest news Saam TV Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर, प्रज्ञा सातवांना भाजप पुन्हा संधी देणार? असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Pradnya Satav latest news : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रज्ञा सातव यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Ganesh Kavade

Maharashtra MLC by-election 2026 Pradnya Satav candidature : महाराष्ट्र आणि बिहारमधील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील डॉ. प्रज्ञा राजीव सातव आणि बिहारमधील मंगल पांडे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्याची निवडणूक महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांबरोबरच होणार आहे. दोन्ही निवडणुकांसाठी सदस्यांचा कोटा वेगळा असणार आहे.

प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूकही १२ मे रोजी पार पडणार आहे. डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीत विधानसभा सदस्य (MLAs) मतदान करून नवीन सदस्यांची निवड करतील.

कांग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत होता. दरम्यान, ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडे आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीची जागा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक:

निवडणूक अधिसूचना: २३ एप्रिल २०२६ (गुरुवार)

नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२६ (गुरुवार)

अर्जांची छाननी: २ मे २०२६ (शनिवार)

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: ४ मे २०२६ (सोमवार)

मतदानाचा दिनांक: १२ मे २०२६ (मंगळवार)

मतदानाची वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत

मतमोजणी: १२ मे २०२६ (मंगळवार) सायंकाळी ५:०० वाजता

या पोटनिवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येणार आहे. ही निवडणूक विधानसभा सदस्यांमार्फत होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी आपली संख्याबळे टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil Photos : इतकं सुंदर हास्य, कॅमेऱ्यातही सहज टिपलं; गौतमीचे फोटो पाहून चाहते अवाक

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी शेकडो वारकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

'कैसा हराया...! MIM ची नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, वडिलांचाही पत्ता लागेना

Rude People Behavior: उद्धट लोकांशी कसं वागावं? गप्प बसण्यापेक्षा उत्तर देणं कसं फायदेशीर ठरतं?

नांदेडमध्ये भंयकर दुर्घटना! महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ४ चिमुरड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT