MLC ELECTION 2022
MLC ELECTION 2022  Saam Tv
महाराष्ट्र

MLC ELECTION 2022 : निकालाआधीच एकनाथ खडसे समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये लावले विजयाचे बॅनर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव: राज्यात गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीची (Election) चर्चा सुरु आहे. अखेर आज निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. काँग्रेसने भाजपच्या दोन मतांविरोधात आक्षेप नोंदवला आहे, त्यामुळे मतमोजणीला उशीर लागणार असल्याचे बोलले जात आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मत मोजणीअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगरमध्ये खडसे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. (Maharashtra vidhan parishad election 2022)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीवरुन भाजपकडून आरोप सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांना मदत करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एकनाथ खडसे यांनीही सर्व आमदारांना भेटून मदत करण्याचे आव्हान केले होते. तर भाजपने एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे ही निवडणूक (Election) अटीतटीची झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विजयी करण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षांना दोन, दोन जागा देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज रिंगणात आहेत. भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या विरोधात ही लढत होणार आहे. २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे समर्थकांनी अभिनंदनाने बॅनर लावले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये निकालाआधीच उत्साह दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांचा विजय होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

Crop Insurance : पीक विम्याचे तीन लाखांवर अर्ज फेटाळले; शेतकऱ्यांच्या हाती निराशा

Physically Abused Case: महिलेकडून खोट्या अत्याचाराचा आरोप; कोर्टाने सुनावली ४ वर्षाची शिक्षा

SCROLL FOR NEXT