Maharashtra Unseasonal Rain Update:  Saamtv
महाराष्ट्र

Unseasonal Rain: बळीराजावर आभाळ कोसळलं! राज्यभरात गारपीट, अवकाळीचा तडाखा; भाजीपाला, आंब्याच्या बागा उध्वस्त

Maharashtra Unseasonal Rain Update: राज्यभरात वादळी वारा अन् गारपीटीचा तडाखा पाहायला मिळत असून यामध्ये शेतीमालाचे अतोनात नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षे, फळबागा उध्वस्त झाल्या असून जनावरे दगावल्याच्याही घटना समोर आल्यात.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. २१ एप्रिल २०२४

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील विविध भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यभरात वादळी वारा अन् गारपीटीचा तडाखा पाहायला मिळत असून यामध्ये शेतीमालाचे अतोनात नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षे, फळबागा उध्वस्त झाल्या असून जनावरे दगावल्याच्याही घटना समोर आल्यात.

धाराशिवला झोडपलं

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. यामध्ये फळबागांच मोठं नुकसान झाले आहे. यावेळी पावसासह वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणचे झाडे उन्मळून पडली आहेत. तर शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळालं आहे. पॉली हाऊसचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सामच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूरमध्येही अवकाळीचा कहर!

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जिल्ह्यात एकूण 13 जनावरे आणि दोन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. दरम्यान या गारपीटने जिल्ह्यातील काढणीला आलेल्या शेतीपिकाचे आणि केशर या आंबा फळबागेच अतोनात नुकसान झालं अक्षरशः आंब्याची रास झाडाखाली झाली आहे. जिल्ह्यातील शेती पिकांचं आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवस पावसाचा जोर कायम..

भारतीय हवामान विभागाने पुणे आणि इतर अनेक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसासाठी येलो अलर्ट (Maharashtra Weather Forecast) जारी केला आहे. पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

SCROLL FOR NEXT