Maharashtra Weather Alert Yellow Alert In 12 Districts AI Image
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात पुन्हा पावसाच्या सरी, १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Today Weather Update News : महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर अनेक भागांत उकाडा कायम राहण्याचा अंदाज.

Alisha Khedekar

  • राज्यात पावसाचे संकेत

  • १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावसह अनेक शहरांत कमाल तापमान ३६ अंश

राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका कायम असतानाच वातावरणात बदल होऊन पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. काल कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्याच्या उर्वरित भागांत उष्णता आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि लातूर, तसेच विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

५ जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज

अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, राज्यातील अन्य भागांत उकाडा जाणवू शकतो. दिवसभर तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.

विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उकाडा

राज्यात काही ठिकाणी पावसाचे संकेत मिळत असले, तरी अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आले आहे. यवतमाळ येथे ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३६.८, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३६.५, जळगावमध्ये ३६.४, तर धुळे, जेऊर, चंद्रपूर आणि वाशीम येथे ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. राज्यात एका बाजूला उष्णतेचा तडाखा, तर दुसरीकडे काही भागांत पावसाचे संकेत असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानात होणाऱ्या बदलांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonia Gandhi : आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, सोनिया गांधींच्या त्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी साजरी केलेली दिवाळी हा क्षण मनाला स्पर्श करणारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी 'हा' गुलाबी चहा ठरतो फायदेशीर, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटीची ढेरी होईल गायब

Diwali Weight Loss Tips: कितीही फराळ खाल्ला तरी वजन वाढणार नाही, फक्त घरी १० मिनिटं करा 'हा' एक व्यायाम

UPSC ची तयारी, KBC मध्ये सहभाग अन् शेवटी 'चोर'! बीटेक पदवीधराच्या अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासाची थरारक कहाणी

SCROLL FOR NEXT