CM Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख! काय आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, फडणवीस सरकारचा प्लान काय?

maharashtra women farmers empowerment bill 2026 : महिला शेतकऱ्यांना आता स्वतंत्र ओळख मिळणार आहे. त्यादृष्टीने अत्यंत महत्वाचं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

Nandkumar Joshi

राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ आगामी पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

राज्यातील कृषी क्षेत्रात ८१ टक्क्यांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. बहुतांश कृषी धोरणे आणि सरकारी योजना पुरुषकेंद्री आहेत. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला, तसेच मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सर्व सूचनांचा विचार करून विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करा. कृषी क्षेत्रातील महिलांना ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता देणे, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश असावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, बागायती, फुलशेती, मशरूम उत्पादन, कृषी वनीकरण, वनउपज संकलन असे विविध उपक्रम तसेच भूमिहीन शेतकरी, भाडेकरू शेतकरी, शेतमजूर, चराई व्यवसाय करणारे आणि स्थलांतरित कृषी कामगार यांचाही यामध्ये समावेश करावा. महिलांना राज्य शासनाच्या कर्ज योजना, कृषी अनुदाने, बियाणे, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकेल अशी डिजिटल प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सर्व अभ्यास करावा. महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करणे या बाबींचा समावेश करावा, असेही निर्देश फडणवीसांनी संबंधितांना दिले. सांगितले.

स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जावा. जिल्हा आणि तालुका व गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती असावी; जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण करेल. हे विधेयक राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रात लिंगसमतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी महिला सक्षमीकरण विधेयकाचे सादरीकरण कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Bottle Side Effects: तांब्याच्या बाटलीत या ५ गोष्टी कधीही ठेवू नका; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

2 भावांनी नांगर ओढून जमीन कसली, बैलजोडी नसल्यानं नांगराला जुंपण्याची वेळ

सरकारी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; 4000 EVM मशीन जळून खाक, राजकीय वर्तुळात संशयाचा धूर

Diabetes Risk: पोटावरील चरबीमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT