Teachers protesting in Maharashtra as 80,000 schools shut over TET mandate and recognition policy. Saam Tv
महाराष्ट्र

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

Teachers Revolt in Maharashtra: राज्यात शिक्षकांनी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय.. मात्र शिक्षकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? आणि सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपाची पुढील दिशा काय असणार आहे...

Bharat Mohalkar

सुप्रीम कोर्टाने 53 वर्षाच्या आतील वय असणाऱ्या सगळ्याच शिक्षकांसाठी अनिवार्य केलेली टीईटी आणि 2024 चं संच मान्यता धोरणाच्या मुद्द्यावर शिक्षकांनी शाळा बंदची हाक दिली..त्यावर तोडगा निघालाच नाही... आणि शिक्षक संघटनांनी आंदोलन छेडलं...

शिक्षकांच्या नेमक्या मागण्या काय?

टीईटी अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी याचिका दाखल करण्याची मागणी

एनसीटीईच्या निकषात बदल करण्याची मागणी

2024 चं संचमान्यता धोरण रद्द करण्याची मागणी

शिक्षकांनी जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील 80 हजार शाळा बंद आहेत... मात्र आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं म्हणून आंदोलन करत नाहीत तर आमच्या हक्कासाठी लढत असल्याचं आंदोलनकर्त्या शिक्षकांनी म्हटलंय.. दुसरीकडे 35 वर्षे शिकवण्याचं काम केलेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षाला बसवणं अन्यायकारक असल्याची भावना महिला शिक्षकाने व्यक्त केलीय..

दोन वर्षांत टीईटी पास न झाल्यास शिक्षकांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार तर आहेच...मात्र संच मान्यतेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. ग्रामीण भागात मराठी शाळा बंद पडत असल्याने अनेक पद आता रिक्तच नाही तर कायमची संपण्याची भीती निर्माण झालीय.. त्यामुळे आता शिक्षकांच्या संपामुळे सरकार आपल्या निर्णयावरुन माघार घेणार की शिक्षक विरुद्ध संघर्ष आणखी टोकाला जाणार... याचीच उत्सुकता लागलीय.

मात्र सरकारविरुद्ध शिक्षक संघर्षात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार हे मात्र निश्चित.. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान टाळण्यासाठी लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics:निवडणुकीपुरते वाद नंतर हम साथ-साथ; शिंदे-चव्हाणांसाठी फडणवीसांची 'डिनर डिप्लोमसी'

सुरक्षारक्षकांचा आवाज उठवल्यानं गुन्हा दाखल; पवई हिरानंदानी परिसरातील देशमुखांच्या 'त्या' राड्यावर पत्नीचा मोठा खुलासा

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

SCROLL FOR NEXT