mahayuti Saam tv
महाराष्ट्र

Guardian Minister List : बीड, पुणे कुणाकडे? फडणवीस सरकारमधील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी, कोणत्या मंत्र्याला कोणता जिल्हा? वाचा

maharashtra Guardian Minister List : फडणवीस सरकारमधील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी हाती आली आहे. राज्यात कोणत्या मंत्र्याला कोणता जिल्हा? मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Ganesh Kavade

मुंबई : महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर साऱ्यांचं लक्ष पालकमंत्रिपद वाटपाकडे लागलं आहे. एकीकडे महायुती सरकारचा पालकमंत्रिपदाचा तिढा प्रजाकसत्ताक दिनापर्यंत सुटणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील ८० टक्के जागांवरील तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. तर २० टक्क्यावरील जागांचा तिढा कायम आहे. राज्यातील पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, फडणवीस सरकारमधील संभाव्य पालकमंत्रिपदाची यादी हाती आली आहे.

राज्यातील रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. मुंबई शहर आणि साताऱ्यातील भाजपसहित शिवसेना आग्रही असल्याची माहिती हाती आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप-शिवसेनामध्ये रस्सीखेच पाहायाला मिळत आहे. दुसरीकडे रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना द्यायला शिवसेना शिंदे गटाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, बीडचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याकडेही साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाला विरोध होत असल्याने बीडचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे लोकांचं विशेष लक्ष लागलं आहे.

फडणवीस सरकार मधील संभाव्य पालकमंत्री यादी

नागपूर चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे एकनाथ शिंदे

पुणे अजित पवार

बीड अजित पवार

मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा

मुंबई शहर प्रताप सरनाईक

पालघर गणेश नाईक

रायगड भरत गोगावले / आदिती तटकरे याच्या कडून देखील दावा

रत्नागिरी उदय सामंत

सिंधुदुर्ग नितेश राणे

सोलापूर जयकुमार गोरे

अमरावती चंद्रकांत पाटील

जालना अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाठ

नाशिक दादा भुसे / भाजप कडून गिरीश महाजन यांची मागणी

लातूर बाळासाहेब पाटील

यवतमाळ संजय राठोड

बुलढाणा आकाश फुडकर

नंदुरबार अशोक उईके

कोल्हापूर हसन मुश्रीफ / प्रकाश आबिटकर

अकोला - संजय सावकारे

बुलडाणा - आकाश फुंडकर

धुळे - जयकुमार रावल

गोंदिया - आदिती तटकरे यांना देण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

SCROLL FOR NEXT