SSC & HSC Board Exam Result
SSC & HSC Board Exam Result Saam tv
महाराष्ट्र

SSC-HSC Result 2023: दहावी-बारावीचा निकाल लवकरच; बोर्डाने दिली महत्वाची माहिती...

डॉ. माधव सावरगावे

SSC-HSC 2023 Result Date: सीबीएसई, आयसीएसई आणि आयएससी बोर्डाने नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. (Latest Marathi News)

दहावी-बारावी परीक्षा निकाल (Result) यंदा येत्या दहा दिवसात लागण्याची शक्यता आहे. निकालासाठी बोर्डाकडून तयारी पूर्ण झाल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी बारावी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Borad Exam)

संभाजीनगर बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी बारावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून अंदाजे १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

काही ठिकाणीचे गैरप्रकार सोडले तर परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. परीक्षेदरम्यान शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यातच शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यभरात सरकार विरोधात असहकाराचे धोरण स्विकारुन आंदोलन सुरु केले होते.

त्यामुळे सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा बोर्डाकडे पाठवल्या होत्या. त्यामुळे बोर्डाला परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब होवू शकतो, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. मात्र, संप मिटल्यानंतर शिक्षक, प्राध्यापकांनी वेळेत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाला पाठवल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT