अनेक घरांना आगीचा विळखा.
अग्निशमन दलाचे दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झालेत.
जीवित हानी नाही मात्र गावातील लोकांचं आर्थिक नुकसान झाले आहे.
नागपूर शहरातील काही भागात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
काही भागात जोरदार वारा आहे. आज दिवसभर तीव्र उन्हानंतर अचानक पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
वडगाव ब्रिज येथे हॉटेल सुवर्णा समोर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही वाहतूक मार्गिका (लेन) पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणून, सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वडगाव ब्रिजकडे येणे टाळावे. कृपया सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा. रास्ता रोको आंदोलन संपुष्टात येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.
भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
भंडाऱ्यासह तुमसर मोहाडी तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.
काल झालेल्या अवकाळी पावसानंतर कापणीला आलेला भातपीक जमीनदोस्त झालं होतं. आज दिवसभर कडक उन्ह होतं.
मात्र, सायंकाळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी.
अवकाळी पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची काहीअंशी उकड्यापासून सुटका झाली असली तरी, भात उत्पादक शेतकरी अक्षरश: चिंतातूर झाला आहे.
हाताततोंडाशी आलेलं भातपिक जमीनदोस्त झालं असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
अमरावती -
अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसाची दमदार हजेरी..
नागरिकांना उकाड्यापासून मिळाला काहीसा दिलासा..
अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने अनेकांची उडाली तारांबळ
या पावसामुळे उन्हाळी हंगामात असलेल्या तिळ, कांदा, संत्रा, पपई, भुईमूग पिकाचे नुकसान होण्याची शक्यता..
नाशिक -
- TCS प्रकरणात नवा ट्विस्ट, पीडित महिलेला गुंगीकारक औषध दिल्याचा आणि ब्लॅक मॅजिकचा सरकारी पक्षाचा गंभीर दावा
- सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडला धक्कादायक मुद्दा
- चारही आरोपींना न्यायालयाकडून ४ दिवसांची पोलीस कोठडी
- तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांच्यावरील आरोप अधिक गंभीर
- महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे यांसह आता गुंगीकारक पदार्थ वापरल्याचाही संशय
- पीडितेला जाळ्यात ओढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला गेला का, याचा SITकडून तपास
- डिजिटल पुरावे, औषधांचा मागोवा, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळीवर चौकशी अधिक तीव्र
- पुढील चार दिवसांत या नव्या अँगलमुळे तपासात महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यातल्या भोर येथील नसरापूर अत्याचार प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
हा प्रकार अतिशय निंदनीय आणि विकृती मनोवृत्तीचा भाग असल्याच म्हणत त्यांनी अशी विकृती बाबत कठोर कायदे करणे गरजेचे आहे.
आरोपीला तत्काळ अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक खटल्यावर चालवून लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे.
रायगड -
- मंत्री आदिती तटकरे वाहतूक कोंडीत आडकल्या
- हेवी व्हेईकल्सना बाजुला फेकून द्या आणि प्रवासी वाहनांना रस्ता मोकळा करण्याचा पोलिसांना सल्ला
- स्वतःच्या गाडीतील माणस खाली उतरवुन रस्ता मोकळा करण्याचा केला प्रयत्न
- गेली दोन दिवस मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापुर येथे वाहतुक कोंडी होत आहे
- काल शुक्रवारी संध्याकाळी मंत्री आदिती तटकरे यांच्या वाहनांचा ताफा इंदापुर येथे वाहतुक कोंडीत अडकला
नायगाव -
नायगाव रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरट्याने शतापीने चोरला मोबाईल
चोरट्याचा चोरी करतानाचा व्हिडिओ एका प्रवासी नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे
भर दिवसा रेल्वे स्थानकात अशा प्रकारे चोरट्याने चोरी करून पळून जात असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वे स्थानकातील सुरक्षा बाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
रेल्वे स्थानकात येणाऱ्या चार्सुल्ले गर्दुल्ले आणि चोरटे यांच्यावर रेल्वे सुरक्षा पोलिसांनी उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुणे -
नसरापूर चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण
पीडित मुलीचा मृतदेह घेऊन नातेवाईक नवले पूल अडवणार
पीडित मुलीचे नातेवाईक आक्रमक
जळगाव -
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीला भीषण आग लागल्याची घटना
एका पाठोपाठ शेजारच्या इतरही चार ते पाच कंपन्यांना देखील आगीच्या लपेट्यात आल्याची माहिती आहे
अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम शर्थीने सुरू करण्यात आले आहे
वाढत्या तापमानात शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे
आगीत कंपनीतील तीन ते चार सिलेंडरचा स्पोट झाल्याची माहिती
चटई बनविण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाल्याची सूत्रांची माहिती आहे
आग एवढी भीषण आहे की तीन ते चार किलोमीटरवरून धुराचे लोट बाहेर पडताना दिसून येत आहे
मज्जा मस्ती आणि जॉय रायडिंगसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या चार तरुणांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समर्थ पाटील, हर्ष परदेशी, प्रणित शितप आणि सागर ढवळे अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही आरोपी केवळ फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी दुचाकी चोरी करत होते.
सोलापूर शहरालगतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून, संपत्तीच्या वादातून दिरानेच आपल्या भावाच्या संसारावर तलवारीने घाव घालत वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पातील कास्टिंग यार्डमध्ये शनिवारी दुपारी भीषण अपघात घडला. गॅन्ट्री क्रेनला जोडलेला सुमारे १२ मीटर उंच प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने रघुनाथ भक्तबल्लव दास (३८) आणि कला महिंदर सिंग (४५) या दोन कामगारांचा मृत्यू झाला. अपघात दुपारी १२:१५ च्या सुमारास झाला. मृतदेह भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाच्या शर्यतीत कोकण विभागाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ९४.१४ टक्के निकालासह कोकण विभाग राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.मुलींची झेप आणि कोकणचा दबदबा यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. विशेषतः कोकण विभागातील निकालाची परंपरा कायम राहिली असून, राज्याच्या सरासरीच्या तुलनेत या विभागाने मोठी आघाडी घेतली आहे.
पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
बुलढाणा पोलीसांनी सिनेस्टाईल ने पाठलाग करून जालना जिल्ह्याच्या सरहद्दीवर कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक केली आहे. चिखली परिसरात फसवून बोलावून मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पाच आरोपींना जेरबंद करत सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा होत आहे.
तुळजापूर मध्ये पंढरपूर येथील खाजगी गाडीच्या चालकाला बेदम मारहाण करत लुटले
गाडी भाड्याने मिळेल का असे विचारून बोलावून घेतले आणि मारहाण करत 28 हजार रुपये घेतले काढुन
विक्रम प्रकाश टिंगरे असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव
महिला आणि पुरुषांच्या जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती
याप्रकरणी अद्याप कोणताही प्रकारचा गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं होतं. परंतु विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध करत विधेयक ना मंजूर केलं. जर हे बिल मंजूर झालं असतं तर महिलांना लोकसभेमध्ये वाढीव जागा मिळाल्या असत्या. लोकसभेच्या एकूण 816 जागा झाल्या असत्या, त्यात महिलांना 216 जागा मिळाल्या असत्या.परंतु विरोधकांनी बिल मंजूर होऊ दिले नाही.
हिंदू महिलेची पहिली डिलिव्हरी असताना डॉक्टर मुद्दाम सिझरियन करतात का? केवळ हिंदू बालकांच्याच गळ्याला नाळ कशी अडकते? हिंदूंचीच मुलं पोटात आडवी कशी होतात? हे सर्व डॉक्टरांनी रचलेले एक षडयंत्र आहे.कालीचरण महाराज
धुळे जिल्ह्यामध्ये तापमान अधिकच वाढला असून यामुळे पोल्ट्री उद्योग पाठोपाठ आता पशुपालक देखील संकटात सापडले आहेत,
कारण वाढत्या तापमानाचा परिणाम आता पशूंच्या शरीरावर होऊन पशु दगावण्याची भीती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे,
त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशूंची वाढत्या तापमानापासून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे,
शिवसेनेची ताकद सतत वाढत असल्यामुळे उबाठाचे तोंड कडू झालंय. ज्यांना वास्तवाचा सामना करता येत नाही त्यांचा इतरांच्या भरभराटीमुळे जळून कोळसा होता. पण, कोळसा कितीही उगाळले तरी काळाच असतो तशी यांची वृत्ती काळी आहे. उबाठाने मंत्रिमंडळात घेतले तेव्हा बच्चू कडू फार गुणी होते आणि ते शिवसेनेत आल्यावर उबाठाला त्यांच्यातल्या अवगुणांचा साक्षात्कार झाला.
पुण्यात कात्रज घाटामध्ये ट्रॅफिक जॅम झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस बंद पडल्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.
मी संविधान मानत नाही असा दररोज आक्षेपार्ह स्टेटस कल्याणमधील फळ विक्रेत्याने ठेवला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे भीषण पाणी टंचाईने नागरिकांचा संयम सुटला असून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. “पाणी आमचा हक्क आहे”, “गावाला पाणी मिळालेच पाहिजे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
बीडच्या माजलगांव तालुक्यातील उमरी बु. ग्रामपंचायतीला शेतकरी संघर्ष समितीचा “टाळा ठोको” मोर्चा
विमा प्रश्नावर आंदोलन तीव्र.
जालन्यातील बदनापूर शहरात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक
बदनापूर शहरातल्या शिवाजी महाराज चौकात धिरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारून पायदळी तुडवत केलं दहन
जळगाव महापालिकेची तब्बल 42 कोटींची आर्थिक फसवणुक करणाऱ्या अटलांटा कंट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
*महापालिकेतील भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महापालिकेच्या आर्थिक फसवणुकी संदर्भातला प्रकरण उघडकीस आणून सर्वात आधी
शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दिली होती*
महापालिकेकडून गुन्हा दाखल होत नसल्याने भाजपचे आमदार सुरेश भोळे, नगरसेवक देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत तक्रार केली होती.
प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महापालिका आयुक्तांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे रायगड मधील समुद्र किनारे हाऊसफुल
मुरूड, अलिबाग, दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी
पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरातील अतिक्रमण काढलं
धार्मिक प्रार्थना स्थळाशेजारी बांधलेले शौचालय आणि पत्र्याचे शेड काढले
हजरत पीर शहादुद्दीन खत्तालवल्ली पन्हाळा ट्रस्टी यांनी स्वतःहुन काढलं अतिक्रमण
महसूल विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही केल्याची स्थानिकाकडून माहिती
यवतमाळच्या नेर तालुक्यात अजंती पारधी बेड्यावर नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू,उष्माघाताचा संशय?
ऊन्हात पाण्यासाठी गेल्याची माहिती,सायंकळी चिमुकलीला चक्कर येऊन पडली अन् जागीच मृत्यू झाल्याची चर्चा
अनवी भोसले असे मृतक चिमुकलीचे नाव,उष्माघातमुळे मृत्यू झाल्याचा संशय? शवविच्छेदन न केल्याची माहिती
बारावी परीक्षा निकाल जाहीर
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी हे दोघे बारावी परीक्षा निकाल जाहीर करतील
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर
प्रस्तावित ५२९ झाडांच्या तोडीविरोधात नागरिक रस्त्यावर
एकत्र येत मानवी साखळी आंदोलन केले.
शहरातील हिरवळ कमी होण्याच्या भीतीमुळे नागरिकांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला.
पर्यावरणाचे संतुलन, स्वच्छ हवा आणि शाश्वत विकासासाठी झाडांचे महत्त्व अधोरेखित करत प्रशासनाने हा प्रस्ताव पुनर्विचार करावा,अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनातून पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता आणि नागरिकांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येतो.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळमार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जाणार
राज्य मंडळ अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी पत्रकार परिषद घेणार ...
११ वाजता पत्रकार परिषद सुरू होईल
० श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलर चा अपघात
० आंबा तोडणीसाठी निघालेल्या पिक अप टेम्पो वर श्रीवर्धन दिशेकडे जाणारा ट्रेलर पलटला
० अपघातात एकाचा चिरडून मृत्यू
० क्रेन च्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाहेर काढण्याच काम सुरू
मुंबई पुणे लेनवर आडोशी बोगद्याजवळ एका गाडीचा अपघात झाला होता, म्हणून पुणे लेन काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती, आत्ता वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.. तर दुसरीकडे काल मिसिंग लिंक चं उद्घाटन झाले होते त्यामुळे पुणे मुंबई लेनवर मंडप टाकले होते, ते काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अर्धा तासाने ही लेन सुरू होईल..
हापूस व पायरी आंबा सध्या मोठ्याप्रमाणात बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत.
पायरी 200 ते 250 हापूस 300 ते 350 रूपये दराने विकला जात आहे. गेल्याच आठवडय़ात याच आंब्याचा दर चारशे ते पाचशे रूपये एक डझन असा विकला जात होता मात्र आवक वाढल्यामुळे आंब्याचा दर कमी झाला आहे.
यंदा बदलत्या हवामानाचा फटका देवगड हापूसला बसला आहे. सुरूवातीला ढगाळ वातावरण, त्यानंतर अवकाळी पावसाच्या सरी आणि आता वाढता उकाडा यामुळे आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासून वाहनांच्या रांगा
० काल दिवसभर आणि आज सकाळ पासून नागोठणे माणगाव, इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा
० सलग तीन दिवस सुट्टयांमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर कोकणवासीय आणि पर्यटक कोकणाच्या दिशेने यायला निघाल्याने होत आहे वाहतूक कोंडी
० वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपात देखील वाहनांची मोठी गर्दी
- गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या ट्रॅक आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे 3 मे ते 23 मे या कालावधीसाठी विदर्भ एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
- त्यामुळे 23 मे पर्यंत गोंदिया ऐवजी नागपूर स्थानकावरून सुटणार आहे
- या बदलांमुळे दोन्ही दिशेच्या 21 फेऱ्यांवर परिणाम होणार असून प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे...
- ‘डिजिटल अरेस्ट’च्या सापळ्यात अडकलेल्या दाम्पत्याची १३ लाखांने फसवणूक, मात्र सायबर पोलिसानी मिळून दिली रक्कम परत.
- एटीएस अधिकारी असल्याचे सांगत फोनवर तुमचं सिम दहशतवादी वापरत असल्याची बतावणी करत भीती दाखवली
- महिलेला अटक होईल असा दबाव, मानसिक धाक दाखवत 13 लाख रुपये उकळले..
- २२ मार्चची बेसा परिसरातील घटना उघडकीस आलीय.. सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा
- तक्रार मिळताच पोलिस अॅक्शन मोडमध्ये, बँक व्यवहारांचा मागोवा घेत संबंधित बँक खाती गोठवली, जलद कारवाईमुळे रक्कम सुरक्षित
- महावितरणच्या दुरुस्ती कामांमुळे आज सिडकोसह पूर्व नाशिकचा पाणीपुरवठा राहणार बंद
- आज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मुकणे पंपिंग स्टेशन आणि रेमंड सबस्टेशन येथे मान्सूनपूर्व कामे केली जाणार
- वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचा उपसा पूर्णपणे राहणार बंद
- सिडकोतील प्रभाग २७, २८, २९, ३१ तसच पूर्व नाशिकमधील अनेक भागांचा दुपारचा पाणीपुरवठा होणार नाही
- वाढत्या उन्हात पाणीकपातीचा फटका, महापालिकेकडून नागरिकांना पाणी साठवून काटकसरीने वापरण्याचे आवाहन
गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे सामूहिक वाचन विविध पुरोगामी संघटनेच्या वतीने यवतमाळच्या शिवतीर्थ येथे करण्यात आले. जो काही वाद महाराष्ट्रमध्ये निर्माण झाला याचा निषेध यावेळी करण्यात आला. या पुस्तकात जे काही लिहले आहे याचे सारमर्थ करण्यात आले. हे पुस्तक सर्व विद्यार्थी आणि घरापर्यंत पोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बेकायदेशीरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी खंडणी पथकाने केली अटक
खडकी परिसरातून हितेश चांदणे ला अटक
हितेश हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर मोकासारखी गंभीर गुन्हे दाखल आहेत
हा हा पिस्तूल त्याने कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत
सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद
आज अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार बारावीचा निकाल
कोणता विभाग बाजी मारणार या कडे लागल सगळ्यांचं लक्ष
महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन अंतर्गत कंपनीने 100 गरजू व होतकरू तरुणांना 100 कृषी ड्रोन वितरण उपक्रम सुरु केला आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात देशातील ड्रोन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Cerebrospark Innovations यांनी महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशनचे लोकार्पण केले. सोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कृषी ड्रोन तंत्रज्ञान पोहचावे यासाठी महा - ड्रोन यात्रेला सुरुवात केली.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव समोर आला असून, H5N1 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. तिसऱ्यांदा हा संसर्ग आढळल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या कोंबड्यांमध्ये H5N1 ची लागण झालेली असताना प्रतिबंधासाठी H9N2 ही लस देण्यात आली आहे. मात्र ही लस प्रभावी ठरत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांकडून केला जात असून, H5N1 साठी लाईव्ह वॅक्सीन देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नवापूर परिसरात सुमारे 12 लाख पक्षी असून, परिस्थिती गंभीर झाल्यास मोठ्या प्रमाणावर कलिंग करण्याची वेळ येऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.