मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) आज १७ जून, २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. (SSC Exam Result 2022 news updates)
दरम्यान, हा निकाल विद्यार्थाना कसा पाहता येणार आहे याबाबत महामंडळाने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा, इयत्ता १० चा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत असून हे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १७/०६/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
हे देखील पाहा -
दहावी मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून (वेबसाईटवरुन) उपलब्ध होणार आहेत शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रिंट देखील घेता येणार आहे. मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
SSC Result 2022: असा तपासा निकाल
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा .
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासू शकता.
त्यानंतर तुम्हाला विषयानुसार प्राप्त झालेल मार्क वरील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.
दहावीच्या परीक्षेत 1,449,660 विद्यार्थी सहभागी
15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी या वर्षी दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक लक्ष लावून बसले आहेत. मात्र ती प्रतीक्षा आता संपली असून आज दुपारी १:०० वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.