ST employees strike in Maharashtra:   Saamtv
महाराष्ट्र

ST Employees Strike: लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप; काय आहेत मागण्या? वाचा सविस्तर...

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी ३ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. २५ हजार रुपये दिवाळी भेट, १२,५०० रुपये सणउचल, वेतनवाढ आणि महागाई भत्त्याच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय? जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

दिवाळीच्या तोंडावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे दिवाळीत गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना याबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र होणार आहे:

३ नोव्हेंबर: राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद आणि तीव्र निदर्शने.

४ नोव्हेंबर: राज्यभरात भव्य द्वारसभा आणि निदर्शने.

५ नोव्हेंबरपासून: मागण्या मान्य होईपर्यंत राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?

दिवाळी भेट व सणउचल: कर्मचाऱ्यांना २५,००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपये सणउचल तात्काळ देण्यात यावी.

वेतनवाढ व भत्त्यांची थकबाकी: २०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी आणि २०१८ पासूनची महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करावी.

महागाई भत्ता वाढ: जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात यावा.

इतर प्रलंबित मागण्या: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, निवडश्रेणी व श्रेणीकरणाचे परिपत्रक रद्द करावे, निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता आणि स्थानिक पूरक भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी.

प्रवाशांवर परिणाम?

दिवाळीनिमित्त चाकरमानी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. ५ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारल्यास एसटी बस फेऱ्यांवर याचा थेट परिणाम होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : श्वास घेताना छातीत वेदना होत असल्याने शरद पवार यांच्यावर उपचार सुरू

Mumbai : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची फसवणूक! बँक खात्यातून परस्पर पैसे गायब

Running vs zumba: रनिंग की झुंबा? फिटनेससाठी कोणता व्यायाम आहे बेस्ट?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरूवात, तुमच्या खात्यात पैसे झाले का जमा?

Walking for Diabetes: चालल्याने ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या वेळी चालणं ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT