Hingoli Crime  Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Firing : हिंगोली हादरलं! पोलीस कर्मचाऱ्याचा बायको आणि पोराबाळांवर बेछुट गोळीबार

Policeman firing on wife and child : हिंगोलीत SRP जवानाचा कुटुंबावर बेछुट गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक महिला ठार झाली आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या जवानाने स्वत:च्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केलाय. या गोळीबारात एक महिला ठार झाली आहे. तर चिमुकला आणि एक जण गंभीर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने भयंकर कृत्य केलं आहे. हिंगोलीतील या जवानाने थेट कुटुंबावर बेछुट गोळीबार केला आहे. जवानाने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे. तर चिमुकला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भयंकर घटनेने हिंगोली हादरलं आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात त्याची बायको ठार झाली आहे. तर दीड वर्षाच्या चिमुकल्यासह सासू आणि आणखी एक जण जखमी झाला आहे. या गोळीबारातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विलास मुकाडे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

कर्मचाऱ्याने काढला पळ

हिंगोलीमध्ये गोळीबाराच्या घटनेचा थरार पाहायला मिळालाय. एका पोलीस कर्मचाऱ्याने संपूर्ण कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी जागीच ठार झाली. तर दीड वर्षाचा चिमुकला, सासूसह आणखी एक नातेवाईक गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने पळ काढला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार का केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: पराभव KKR चा, फटका मात्र CSK ला; हैदराबादच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

Summer Tips: उन्हाळ्यात आईस्क्रिम खावे की नाही?

टॅब चोरी केला; 200 अश्लील व्हिडिओ; 1200000 रुपयांची खंडणी, नाशिकमध्ये सेक्स कँडल उघडकीस

SCROLL FOR NEXT