MAHARASHTRA DROUGHT: BEED VILLAGES EMPTY AS FARMERS MIGRATE saam tv
महाराष्ट्र

पोटासाठी घर सोडलं, गावं पडली ओस, 'या' जिल्ह्यातील गावांमध्ये घरांना टाळं

Beed Villages Turn Empty as 900 People: भीषण दुष्काळामुळे राज्यातील गावं ओस पडू लागलीयेत. पाण्याअभावी जनावरे आणि माणसांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालाय. तर हातचं पिकं गेल्यानं आर्थिक चणचण जाणवू लागलीये. त्यातच आता कौटुंबिक कार्यक्रमांवर संकट आलंय. राज्यातील दुष्काळग्रस्तांचं जगणं किती अवघड झालंय?... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Rohit Kadam

राज्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आलीये. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी कामाच्या शोधात शहराची वाट धरताना दिसतायत. घर सोडण्याची वेळ आल्यामुळे आता मराठवड्यातली गावं ओस पडू लागली आहेत. दुष्काळात होरपळून निघालेल्या बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा गाव निर्मनुष्य होणार की काय अशी भीती आता वाटू लागलीय. कारण 1400 लोकसंख्या असलेल्या या गावातून 900 लोकांनी पोटापाण्यासाठी स्थलांतर केलंय. गावामध्ये घरांना टाळं लागलंय तर गावात वयोवृद्ध नागरिकांशिवाय कुणीही दिसेनासं झालंय.

एव्हंढच नव्हे तर दुष्काळामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय. नद्या आणि विहिरी कोरड्याठाक पडल्यानं महिलांनी संताप व्यक्त केलाय. चाऱ्याअभावी आणि भीषण उष्णतेमुळे मेंढ्यांचे आरोग्य खालावत असून मेंढपाळ बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत.

दुष्काळाचा परिणाम फक्त शेती आणि पाण्यापुरता मर्यादित नाहीये. वाढत्या आर्थिक नुकसानीमुळे आता तरुण-तरुणींची लग्नही खोळंबली आहेत. अनेक शेतकऱ्यांवर लग्नं लांबणीवर टाकण्याची वेळ आलीये. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललीय. आता बीडची गाव ओस पडू लागली असली तरी हे लोण संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पोहचण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्तांवर घराला टाळ लावून आणि गाव सोडण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारनं तातडीनं पुरेशी आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कीर्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना विश्व हिंदू परिषद कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितल्याची तक्रार; मुंबई विद्यापीठाची कारवाई

Indoor Workout Exercise: दररोज १०००० पावलं चालण्याचा कंटाळा आलाय? मग घरातल्या घरात ट्राय करा या 5 एक्सरसाईज

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

SCROLL FOR NEXT