students 
महाराष्ट्र

पुढच्या वर्षी पहिलीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

या नव्या संकल्पनेमुळे पालकांची चिंता मिटणार आहे. मुलांना देखील संकल्पनेचा फायदा हाेणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता पहिलीतील (standard 1) विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझं (school bag) कमी करण्यासाठी राज्य शालेय शिक्षण विभागाने चार विषयांचे एकच पुस्तक (four subjects one text book) अशी संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रात (maharashtra) या संकल्पनेची शाळांत प्राथमिक वर्गांसाठी टप्याटप्याने अंमलबजावणी करणार असल्याचे नमूद केले.

इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना दप्तराचे वजन पेलवत नाही अशी तक्रार नेहमी आपल्या कानावर पडत असते. यामुळं विद्यार्थ्यांच्या पाठीस त्रास हाेताे अशी तक्रार देखील हाेत असते. याचाच विचार करुन राज्य शिक्षण विभागाने आता इंग्रजी, मराठी, गणित तसेच खेळा आणि शिका या चार विषयांचे एकच पुस्तक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचे वेगळे पुस्तक घेऊन जाण्याऐवजी विद्यार्थ्यांना सेमिस्टरनुसार भाग १, २, ३ अथवा ४ असाे फक्त एकात्मिक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.

बालभारतीचे (balbharati) संचालक (राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन ब्यूरो) विवेक गोसावी म्हणाले सहाव्या वर्षी विद्यार्थ्यी इयत्ता पहिलीच्या वर्गात जाताे. त्याच्या दप्तरात किमान ८३० ग्रॅम पाठ्यपुस्तक असतता. त्याच दप्तरात असलेली पाण्याची बाटली, डबा आणि वह्या असे सर्वांचे मिळून साधारणतः एक किलोच्या पुढं वजन जाते. आता नव्या संकल्पनेनुसार पाठ्यपुस्तकांचे वजन २१० ग्रॅमने कमी हाेणार असल्याचा दावा गाेसावी यांनी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर आम्ही ४८८ मॉडेल स्कूलमध्ये ही पुस्तके सादर केली आहेत आणि त्यास उत्तम प्रतिसाद असल्याचे गाेसावी यांनी नमूद केले.

आगामी शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक दिले जाईल. त्यानंतर इयत्ता दुसरी आणि अशाच प्रकारे अन्य प्राथमिक वर्गांसाठी ही संकल्पना राबविले जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा जेव्हा लागू केले जाईल तेव्हा आम्ही त्यामध्ये तसे बदल देखील समाविष्ट करू असे गाेसावी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले हे पाठ्यपुस्तक वापरणाऱ्या शिक्षकांकडून चांगले अभिप्राय प्राप्त झाले आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांना देखील आवडला आहे असेही गाेसावी यांनी नमूद केले.

दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या म्हणण्यानूसार हा स्तुत्य उपक्रम आहे. डाेंगर द-यातून येणा-या मुलांना याचा फायदा हाेईल. दप्तर हलके हाेणार असल्याने ते आनंदित हाेतील. पुस्तकातील उपक्रमही उपयुक्त आहेत.

असे आहे एकात्मिक पाठ्यपुस्तक

पुस्तकाच्या प्रत्येक भागाची थीम आहे.

'मी आणि माझे कुटुंब'.

पाणी.

प्राणी.

वाहतूक आणि आम्हाला सहकार्य करणारे लोक.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT