Maharashtra School Summer Holidays 2026  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

Maharashtra School Summer Holidays 2026: राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले.

Priya More
  • महाराष्ट्रातील शाळांच्या सुट्टीचे वेळापत्रक जारी

  • शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टी कधीपासून सुरू होणार याबाबत परिपत्रक काढले

  • ३ मे ते १४ जून २०२७ या काळात शाळांना उन्हाळी सुट्ट्या

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२६ -२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि सुट्ट्यांबाबत परिपत्रक जारी केले आहे. यानुसार राज्यातील सर्व शाळांना ३ मे ते १४ जून २०२७ या काळात नेहमीप्रमाणे उन्हाळी सुट्टी लागू राहणार आहे. या सुट्टीचा कालावधील ४३ दिवसांचा असणार आहे. त्याचसोबत शिक्षण विभागाकडून दिवाळी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १३ दिवसांची दिवाळी सुट्टी मिळणार आहे.

राज्य शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांचे दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांबाबतचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार, राज्यातील सर्व शाळांना दिवाळीनिमित्त २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांनंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळांमध्ये नियमित वर्ग पूर्ववत सुरू होऊन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सत्राला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १५ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होत आहे. तर दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत चालणार आहे. त्यानंतर ३ मे ते १४ जून २०२७ या काळात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागेल. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा तसेच ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज हे मुख्य सण येत आहेत.

शिक्षण विभागाने अशा देखील सूचना दिल्या आहेत की, शाळा व्यवस्थापनाने या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात परस्पर अथवा स्वेच्छेने कोणताही बदल करू नये. स्थानिक पातळीवरील सण अथवा अपरिहार्य कारणास्तव तारखांमध्ये फेरबदल करावयाचा असल्यास संबंधित शाळांना शिक्षण विभागाची रीतसर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन शासनाकडून वेळेत जाहीर झाल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना आगामी सणांचे औचित्य साधून आपल्या कौटुंबिक प्रवासाचे आणि सुट्ट्यांचे पूर्वनियोजन करणे अधिक सोपं झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माईकची तोडफोड, फाईल्स फेकल्या; प्रदुषणाच्या चर्चेवेळी महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

जिथून निवडून आले तिथे जनतेसाठी काम करा; पुढील 30 वर्ष...; अमित शाह यांची भविष्यवाणी, राहुल गांधींनाही दिला सल्ला|VIDEO

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला कोण? श्रीकांत शिंदे अन् भाजपच्या २ आमदारांची नावं घेतली? शिंदेसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांना काय सांगितलं?

काँग्रेस आमदारचा भीषण अपघात; MLAच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक

दुष्काळात गुन्हेगारीचा सुळसुळाट, कायदा- सुव्यवस्था बिघडली, पोलिस यंत्रणा अलर्ट

SCROLL FOR NEXT