Maharashtra, Rain Alerts : Saam TV
महाराष्ट्र

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

IMD Maharashtra update: महाराष्ट्रात पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

IMD issues red alert for 22 districts in Maharashtra for heavy rainfall : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती झालेल्या सोलापूर, धाराशिव, जालना अन् लातूरमध्ये पुढील दोन दिवस अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आज आणि उद्या मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वारे पश्चिम दिशेने वाहू लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अतिमुसळधार पावसाचा इशारा कुठे अन् कधी ?

शनिवार, २७ सप्टेंबर

नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे, धाराशिव , लातूर, बीड, अहिल्यानगर

रविवार, २८ सप्टेंबर

सोलापूर, पुणे, सातारा, बीड, अहिल्यानगर,धाराशिव, पुणे, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर

Maharashtra weather forecast 27-28 September heavy to very heavy rain

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर.

लातूर जिल्हा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आज दिवसभर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बील प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT