Buldhana Rain Update: Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: हृदयद्रावक!! वादळी वाऱ्याने घराच्या छतासह बाळ झोपलेला झोपाळा उडाला; ६ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Buldhana Rain Update: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावघुबे गावाला वादळाचा तडाखा बसला. यावेळी झोक्यात झोपलेली सहा महिन्याची मुलगी घरावरील छतासह उडून गेली.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १२ जून २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावघुबे गावाला वादळाचा तडाखा बसला. यावेळी झोक्यात झोपलेली सहा महिन्याची मुलगी घरावरील छतासह उडून गेली. या दुर्घटनेत चिमुकलीचा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. अनेक घरांवरील छत उडून गेली, अनेक झाडेही पडली. अशातच चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घटना घडली. मोठ्या वादळी वाऱ्याने घरावरील छत उडाले, यावेळी घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती.

झोका घराच्या छताला एका लोखंडी अँगलला बांधलेला होता. वादळाने अँगलसह छत व चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेला. साधारणतः २०० फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई भरत साखरे (वय, ६ महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसुर येथे गोठ्यातीलजनावरांची राखण करण्यासाठी गेलेल्या 70 वर्षीय वृद्धाच्या अंगावर गोठा कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नारायण सुखदेव सुरवसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जोरदार पाऊस झाल्याने गोठा जीर्ण होऊन कोसळल्याने ही घटना घडल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT