Maharashtra Rain News: Heavy Rain in Pune, Amravati, Sindhudurg, Buldhana Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather News: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांमध्ये घातलं अवकाळी पावसानं थैमान?

Maharashtra Rain Forecast Update Today: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान मांडलं आहे. काल राज्यात पुणे, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे.

Rohini Gudaghe

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान मांडलं आहे. काल राज्यात पुणे, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. पुण्यात सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. अनेक भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. अमरावतीच्या चिखलदरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.

अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Maharashtra Rain Update) विदर्भात वर्तवला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्गजिल्ह्याच्या काही भागात आज पुन्हा अवकाळी पाऊस कोसळला. सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र, सलग पाच ते सहा दिवस पडत असलेल्या पावसामुळे मान्सून पुर्व शेतीची कामे खोळबंली (Weather Forecast) आहेत.

पुण्यात शहर आणि आजूबाजच्या भागात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने लोणीकंदजवळ शेतकऱ्याच्या घरावर झाड पडले. त्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. पुण्यातील खारवडे मुळशीमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हडपसर, ससाणे नगर , महंमद वाडी, माळवाडी , हांडे वाडी, ( Unseasonal Rain) काळे बोराटे नगर , फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची येथे अर्ध्या तासामध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यात अनेक गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.

काल (१९ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लोणार तालुक्यातील अनेक गावामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामुळे बीबी, किनगाव , देवानगर, खंडाळा,वझर आघावसह अनेक गावात घरावरील टिनपत्रे (Mansoon Update 2024) तसेच देवानगर येथील जिल्हा परिषद शाळेवरील संपूर्ण टिन पत्रे उडून गेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोसळले, झाडे उन्मळून पडली. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT