Maharashtra Rain Alert heavy rain in maharashtra today rain news live Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: कोकण आणि विदर्भात आज मुसळधार पाऊस; मुंबई, ठाण्याचे काय? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

IMD Alert: आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे.

Priya More

Maharashtra Rain: यावर्षी राज्यामध्ये मान्सूनचे (Monsoon 2023) उशिरा आगमन झाले. अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्यो म्हणावा तसा पाऊस पडला नाही. चांगला पाऊस पडत नसल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. जोरदार पाऊस पडत नसल्यामुळे तलावांमधील पाणीसाठी कमी झाला आहे त्यामुळे अनेक शहरांवर पाणीकपातीचे सावट आहे. शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य जनता जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशामध्ये आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे.

मुंबईतल्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे.

आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

तर, आज जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आज ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT