MAHARASHTRA WEATHER UPDATE Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

MAHARASHTRA WEATHER UPDATE: राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे तर काही जिल्ह्यात ऊन्हाचे चटके वाढले आहेत. आज कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला ते घ्या जाणून...

Priya More
  • महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढला

  • काही जिल्ह्यात पाऊस तर काही जिल्ह्याच कडाक्याचे ऊन

  • कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

  • परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल

राज्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. एकीकडे शेतकरी यंदा चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे चिंतेत आहे. तर दुसरीकडे परतीचा पाऊस शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देताना दिसत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये परतीच्या पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यामध्ये आज ढगाळ हवामान राहिल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यामध्ये ऊन सावल्यांच्या खेळासोबत उन्हाचा चटका लागण्याची शक्यता आहे.

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात कमालीचा उकाडा वाढला आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. अशामध्ये ऑक्टोबर हिटचा देखील त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका वाढला आहे. सूर्य आग ओकत असल्याममुळे घराबाहेर पडणं देखील कठीण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्यानंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगावमध्ये बुधवारी राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये १७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सांगलीच्या तासगाव येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रांका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT